पत्रकाराच्या घरासमोरून चंदनाचे झाड लंपास;गजबजलेल्या वस्तीमध्ये धाडसी चोरी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील ऐनतपूर, वीरभद्रेश्वर मंदिर शेजारील नवले वस्ती येथे आज (रविवार, दि. २१ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास चंदन चोरीची धक्कादायक घटना...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील ऐनतपूर, वीरभद्रेश्वर मंदिर शेजारील नवले वस्ती येथे आज (रविवार, दि. २१ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास चंदन चोरीची धक्कादायक घटना घडली. ज्येष्ठ पत्रकार सुनील नवले यांच्या घरासमोरचे तब्बल १० ते १५ हजार रुपये किंमतीचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी तोडून नेले.
लहानपणापासून काळजीपूर्वक वाढवलेले हे झाड एकाच रात्रीत नाहीसे झाल्याने नवले कुटुंब हतबल झाले आहे. गजबजलेल्या वस्तीमध्येच झाड कापून नेल्याने चोरट्यांनी बेलापूर पोलिसांना थेट आव्हान दिल्याचीच चर्चा रंगत आहे.घटनेच्या वेळी झाडाशेजारील खोलीत झोपलेले नवले यांचे चुलतबंधू झाड पडल्याचा आवाज येताच खिडकीतून बाहेर डोकावले. चोर झाडाचा गाभारा तोडत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. तत्काळ इतरांना जागे केले; मात्र तोपर्यंत चोरट्यांनी मौल्यवान भाग पळवून नेला होता. पाठलाग करूनही चोरटे हाताशी लागले नाहीत.या प्रकरणी सुनील नवले यांनी बेलापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. खुद्द पत्रकाराचेच चंदनाचे झाड चोरीला गेल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या मते, बेलापूर भागात काही चंदन चोरटे वास्तव्य करत असून हेच लोक बाहेरच्या टोळ्यांना माहिती देतात. चंदन चोरीचा तपास लावून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नवले कुटुंबासह ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!