श्रीरामपूर-
श्रीरामपूर – मुंबई एसटी बस सेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी आज एसटी आगार श्रीरामपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेत एसटी आगार प्रमुख अनिल बेहेरे यांनी 6 ऑक्टोबरपासून बस सेवा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.
या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रिपाईचे जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले,
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसाठी श्रीरामपूरहून थेट बस सेवा उपलब्ध नसणे ही खेदजनक आणि संतापजनक बाब आहे. कोरोना काळापासून ही सेवा बंद असल्यामुळे व्यापारी, महिला, वृद्ध व प्रवासी वर्गाला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या निवेदन व आंदोलनाच्या लढ्याला आज यश मिळाले. ही एकजुटीची ताकद असून, जनता आणि विविध पक्षांच्या पाठबळामुळे हे शक्य झाले आहे.या आंदोलनात लहुजी शक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लहू खंडागळे, भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष अल्ताफ शेख, मर्चंट असोसिएशनचे सदस्य योगेश ओझा, शरीफ शेख, आसिफ मणियार राकेश थोरात, किशोर ओझा असलम आत्तार कैलास बाविस्कर गणेश पालकर गणेश कुवर प्रदीप निकम यांचाही सक्रीय सहभाग होता.तसेच, यावेळी एसटी वाहतूक निरीक्षक अनिल पठारे, वरिष्ठ लिपिक राकेश सोनवणे आदी एसटी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.6 ऑक्टोबरपासून सुरू होणारी श्रीरामपूर – मुंबई एसटी बस सेवा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
