पत्रकाराला धमकी देणाऱ्या आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक

श्रीरामपूर-पत्रकार व संपादक अॅड. बाळासाहेब आगे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी गणेश मुंढे याला मध्यप्रदेश मधील इटारसी येथून जेरबंद करण्यात...

श्रीरामपूर-
पत्रकार व संपादक अॅड. बाळासाहेब आगे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी गणेश मुंढे याला मध्यप्रदेश मधील इटारसी येथून जेरबंद करण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले आहे.
श्रीरामपुरात पकडलेल्या नशेच्या इंजेक्शन संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्याची न्यूज इंस्टाग्रामवर टाकली म्हणून सदर न्यूज डिलीट करण्यासाठी आगे यांना या गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश मुंढे याने धमकी दिली होती.या प्रकरणी १८ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीरामपूर शहर पोलिसात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.आगे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करावी या मागणीचे निवेदन श्रीरामपूर तसेच नगर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, अप्पर अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर हा तपास डीवायएसपी जयदत्त भवर यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी एलसीबी चे प्रमुख किरण कबाडी यांचे नेतृत्वाखाली समीर अभंग, फुरकान शेख, रमीजराजा अत्तार, सुनील मालनकर, प्रशांत राठोड यांचे एक पथक तयार करण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, आरोपी मुंढे हा मध्यप्रदेश मधील इटारसी येथे दडून बसला आहे. विशेष पथकाने मध्यप्रदेश मधील
इटारसी येथे जाऊन या आरोपीला तातडीने जेरबंद केले. सदर आरोपी अन्य दोन गुन्हयांसाठीही पोलिसांना हवा होता.पत्रकारीतेचे कर्तव्य बजावणाऱ्या आगे यांना धमकी देणारा आरोपी पोलिसांनी अखेर जेरबंद केल्याने जिल्हाभरातील सर्व पत्रकारांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, डीवायएसपी जयदत्त भवर, एलसीबीचे पोनि. किरण कबाडी, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोनि. नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!