अतिवृष्टीग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश;पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतला आढावा

श्रीरामपूर-जिल्ह्यात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहीती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडून जाणून घेतली. अतिवृष्टीने नागरीकांचे हाल...

श्रीरामपूर-
जिल्ह्यात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहीती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडून जाणून घेतली. अतिवृष्टीने नागरीकांचे हाल होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पाण्यामुळे धोका असलेल्या भागातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरीकांना मदत उपब्लध्द करून द्या.मोठ्या स्वरुपात पाणी आलेल्या नागरी वस्त्यामधील लोकांच्या सहकार्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित कराव्यात अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.रविवारी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने १९ महसूल मंडलातील गावांना मोठ्या नैसर्गिक संकटास सामोरे जावे लागल्याची प्राथमिक माहीती समोर आली असून यामध्ये पारनेर तालुक्यातील ३, पाथर्डी तालुक्यातील ३, श्रीगोंदा तालुक्यातील ८, कर्जत तालुक्यातील ५ मंडलाचा समावेश असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही भागात घरांची पडझड तसेच शेती पिकांचे नूकसान झाले आहे. मात्र पूर परीस्थिती ओसल्यानंतर नूकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल. सध्या तरी नागरीकांना शासनस्तरावरून मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यास प्रशासनाला सांगण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
अतिवृष्टीने पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे विविध ठिकाणी अडकलेल्या १५लोकांची तसेच कासारपिंपळगाव येथील १६लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, सर्व रहीवाशांचे स्थलांतर करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
कर्जत तालुक्यातील करपडी येथे एका घराला तलावाच्या पाण्याने वेढा दिला या कुटंबातील ५व्यक्तिंना बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले आहे. नैसर्गिक संकटाने नूकसान झालेल्या रहीवाशांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या असून, पुढील दोन दिवस जिल्ह्याला हवामान विभागाने अतिपावसाचा दिलेला इशारा विचारात घेवून उपाय योजना करण्याबाबतही सतर्कतेने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!