…अन्यथा प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात भाकड जनावरे सोडू;शेतकरी संघटनेचा इशारा

श्रीरामपूर-राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा तसेच गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करूनत्यातून विदेशी भाकड जनावरे व जर्सी गोऱ्हे यांना...

श्रीरामपूर-
राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा तसेच गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून
त्यातून विदेशी भाकड जनावरे व जर्सी गोऱ्हे यांना वगळण्यात यावे अन्यथा प्रशासनाच्या गाव पातळीवरील पोलीस चौकी, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात भाकड जनावरे सोडणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.
दिनांक 12 रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या माळेवाडी शाखेने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्तीसह गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून त्यामधून विदेशी गोवंश व भाकड जनावरे वगळावी यासाठी माळेवाडी येथील तलाठी कार्यालयावर मोर्चा नेला. सदर मोर्चे प्रसंगी मौजे माळवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी सौ. सरगये नावूर मंडल पशु चिकित्सक केंद्राचे डॉ.श्री डांगे, टाकळीभान चे डॉ.शुभम निर्मळ यांना आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन दिले. तसेच यावेळी पशुपालकांनी दिलेली जर्सी गोऱ्हे शासनाच्या ताब्यात देण्यात आली. अनिल औताडे, भागवत शेळके, चंद्रकांत वमने, नंदू लहारे, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे, प्रदीप काळे आदि पशुपालकांनी आपली अनुत्पादक जर्सी गोऱ्हे आंदोलनस्थळी आणून ग्राममहसूल अधिकारी यांच्या ताब्यात दिली. यावेळी माळेवाडी शाखेचे शाखा अध्यक्ष दिलीप औताडे, उपाध्यक्ष शैलेश वमने, दिलीप औताडे, माजी सरपंच रामभाऊ औताडे, हरिभाऊ ताके, महांकळ वाडगाव शाखेचे शाखाध्यक्ष कडू पाटील पवार, उपाध्यक्ष इंद्रभान चोरमल, गोरख औताडे ,नारायण पवार, मदन हाडके, राजेंद्र वमने, प्रवीण वमने, आयुब शेख, बाबासाहेब औताडे, गोकुळ कडू, गणेश रसाळ आदि शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला होता.
यावेळी जिल्हाध्यक्ष औताडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकी वेळी सगळ्याच राजकीय पक्षांनी ‘सातबारा कोरा करू’असे आश्वासित करूनही आपली फसवणूक केली. आज राज्यात सरासरी दररोज सहा ते सात दुर्दैवी शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यकर्त्यांना या गोष्टीचे काहीच वाटत नाही. शेतकरी आत्महत्या ही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या उंबरठ्यावर पोहोचली असून शेतकऱ्यांवर असलेले कर्ज हे सरकारचेच पाप आहे. या पापाचे परिमार्जन करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा व तसेच गोवंश हत्या बंदी कायद्यातून विदेशी भाकड जनावरे व जर्सी गोऱ्हे वगळून सुधारणा करणे सह वन्यप्राणी जीवा पासून शेती पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे सदर कायदा ही तात्काळ रद्द करावा अन्यथा प्रशासनाच्या गाव पातळीवरील पोलीस चौकी, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात भाकड जनावरे सोडणार असल्याचा सज्जड इशारा जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी सरकारला दिला आहे.

शेतकरी संघटनेने आपली भाकड जनावरे माळेवाडी येथील प्रशासकीय कार्यालयात नेऊन सोडली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!