पोलिसांनी केली 12 अल्पवयीन मुलांची सुटका;पालकांवर होणार अटकेची कारवाई

श्रीरामपूर-शिर्डी येथील साई मंदिर परिसरात पोलिसांनी 12 अल्पवयीन मुलांची सुटका केली असून सदर मुलांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यांच्या पालकांविरुद्ध...

श्रीरामपूर-
शिर्डी येथील साई मंदिर परिसरात पोलिसांनी 12 अल्पवयीन मुलांची सुटका केली असून सदर मुलांच्या पालकांवर गुन्हे दाखल  करण्यात आले आहेत.त्यांच्या पालकांविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये बाल न्याय अधिनियम कलम 75, 76 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असून या पालकांवर अटकेची कारवाई देखील पोलिसांकडून करण्यात येणार आहे.गेल्या काही महिन्यातील शिर्डी शहराची पार्श्वभूमी बघता अशाच अल्पवयीन मुलांनी विविध गुन्हे केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
संपूर्ण राज्यात पोलिसांनी पहिल्यांदाच अशा स्वरूपाची कारवाई केली आहे.शिर्डी शहरात अल्पवयीन मुले की जे शैक्षणिक जीवन सोडून भिक्षा मागणे, हारतुरे विक्री करणे,फुलांची विक्री करणे,फोटो विक्री करणे इत्यादी बाबींमध्ये पालकांकडून अडकवली जातात.यातील बरीच मुले  विविध प्रकारचा नशा करून भाविकांना त्रास देतात.अशा मुलांची सुटका करण्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली,अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
पोलिसांनी केलेलमध्ये कारवाईत एकूण बारा मुलांची सुटका करण्यात आली आहे.या बाराही मुलांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यांना बाल कल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. बालकल्याण समितीकडून या बाराही मुलांची संगमनेर व श्रीरामपूर येथील आधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. केवळ अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांची रवानगी आधारगृहात  
करण्याइतपतच ही मोहीम न थांबवता या मुलांना अशा प्रकारे दुर्लक्षित आयुष्य जगण्यास भाग पाडणाऱ्या, त्यांचे शैक्षणिक आयुष्य उध्वस्त करणाऱ्या त्यांच्या पालकांविरुद्धही  गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यातील शिर्डी शहराची पार्श्वभूमी बघता अशाच अल्पवयीन मुलांनी विविध गुन्हे केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. शिर्डी शहरातील भाविकांची सुरक्षितता, भाविकांच्या शिर्डी शहरातील आगमन या ठिकाणचे वास्तव्य व त्यांचे निर्गमन हे सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली असल्याचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!