श्रीरामपूरात 2 लाखांचा गुटखा पकडला;शहर पोलिसांची कारवाई

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहर पोलिसांनी आज एकलहरे परिसरात छापा टाकून राज्यात विक्री करण्यास प्रतिबंधीत असलेला सुमारे 2 लाख रुपये किंमतीचा विमल केसरयुक्त पान...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहर पोलिसांनी आज एकलहरे परिसरात छापा टाकून राज्यात विक्री करण्यास प्रतिबंधीत असलेला सुमारे 2 लाख रुपये किंमतीचा विमल केसरयुक्त पान मसाला व तंबाखू जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी अमजद नौशाद सय्यद, 30 वर्षे, रा. आटवाडी, एकलहारे, ता. श्रीरामपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की आज गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राज्यात प्रतिबंदीत असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखू असा मुद्देमाल आटवाडी,एकलहरे ता. श्रीरामपूर येथे अमजद नौशाद सय्यद हा विक्री करण्याच्या इराद्याने स्वतः च्या ताब्यात बाळगून आहे.सदर बातमीची शहानिशा सपोनि जाधव व पोलीस पथक यांनी केली असता प्रतिबंधित असलेला विमल केसरयुक्त पान मसाला व तंबाखू आरोपी अमजद नौशाद सय्यद याच्या घराच्या पोर्चमध्ये पोलीस पथकास मिळून आला. तसेच आरोपीच्या घरात देखील मुद्देमाल आहे असा संशय असल्याने आरोपीचे बंद घर दोन पंचांसमक्ष व आरोपीचा भाऊ हमीद सय्यद यांच्या समक्ष उघडले असता घरात देखील प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आला असून सदर मु्देमाल दोन पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच अन्न औषध प्रशासन अधिकारी राजेश बडे यांना कारवाईची फोनद्वारे माहिती दिली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पोलिसांनी 2,06,184 रु किमतीचा सुगंधित विमल पान मसाला जप्त केला असून अमजद नौशाद सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलिसांनी जप्त केलेला विमल पान मसाला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!