श्रीरामपूरमध्ये नशेच्या इंजेक्शनसह दोघांच्या मुसक्या आवळल्या; श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात पोलिसांनी पुन्हा एकदा नशेचे इंजेक्शन विक्री करण्याकरीता आलेल्या दोघांना औषधांच्या 6 बाटल्यासह सापळा रचून गजाआड केले आहे.आरोपींविरुध्द श्रीरामपूर शहर...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात पोलिसांनी पुन्हा एकदा नशेचे इंजेक्शन विक्री करण्याकरीता आलेल्या दोघांना औषधांच्या 6 बाटल्यासह सापळा रचून गजाआड केले आहे.आरोपींविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,
दिनांक 05/09/2025 रोजी 12/20 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खबडी बाबा (म्हसोबा महाराज) मंदिर, वेस्टर्न सिटी हाउसिंग सोसायटी जवळ, वॉर्ड नं.01, श्रीरामपूर येथे अरबाज शेख व गौरव सोनटक्के हे नशेचे औषध व इंजेक्शन विक्री करण्याकरीता त्यांचे अॅक्टिव्हा गाडीवर येणार आहे. त्यावरून त्यानी औषध निरीक्षक सोमनाथ. बा. मुळे यांच्याशी संर्पक करुन तात्काळ पोलीस पथकास खबडी बाबा (म्हसोबा महाराज) मंदिर, जवळ सापळा लावण्यास सांगितला. सदरचे इसम तेथे येताच पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अरबाज मस्तान शेख वय 23 वर्ष, धंदा-ड्रायव्हर, रा. नविन तहसिलसमोर वॉर्ड नं.01 श्रीरामपुर व गौरव रमेश सोनटक्के वय-20 वर्ष, धंदा-मजुरी, रा. दशमेश नगर, पंजाबी कॉलनी, वार्ड नं 01, श्रीरामपुर असे असल्याचे सांगितले.

सदर दोघांच्या ताब्यातुन 2008 रु. किंमतीचे मेफेंटर्मिन औषधाच्या 10 एम.एल.च्या 06 बॉटल, 08 इंन्जेक्शन सिरीन्ज, 60,000/- रु. किंमतीचे गुन्हयात वापरलेले होण्डा अॅक्टिव्हा 6G हे वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांच्याविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर जयदत्त भवर यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील सहा. पोलीस निरिक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरिक्षक अप्पासाहेब हंडाळ, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोकों/अमोल पडोळे, पोकों/अमोल गायकवाड, पोकों/ संपत बडे, पोकों/सचिन दुकळे, पोकों/ राहुल पौळ, मपोकों/ मिरा सरग यांच्या पथकाने केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!