मानाच्या मंडळाकडून एकल महिलांचा सन्मान;अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केली श्रींची आरती

श्रीरामपूर-भारतीय राज्यघटनेचे सार असलेले “संधीची व दर्जाची समानता” हे तत्त्व प्रत्यक्षात आणत श्रीरामपूरच्या आझाद मैदानातील सार्वजनिक गणेश मंडळाने एकल महिलांना गणेशोत्सवानिमित्त...

श्रीरामपूर-
भारतीय राज्यघटनेचे सार असलेले “संधीची व दर्जाची समानता” हे तत्त्व प्रत्यक्षात आणत श्रीरामपूरच्या आझाद मैदानातील सार्वजनिक गणेश मंडळाने एकल महिलांना गणेशोत्सवानिमित्त श्रींची आरती करण्याचा मान देत त्यांचा सन्मान केला.
मंडळ यंदा पंचाहत्तरावे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. जुन्या रूढी, परंपरांमुळे विविध उत्सव व इतर सोहळ्यांमध्ये एकल महिलांना  सहभागी करून न घेता त्यांची काहीही चूक नसताना अंधश्रद्धेपायी अशुभ समजून विविध घरगुती व सामाजिक, धार्मिक सोहळ्यांपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी एकल महिलांसाठी काम करणाऱ्या साऊ एकल महिला समितीने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार राज्यभरात ठिकठिकाणी स्थानिक गणेश मंडळांच्या सहकार्याने एकल महिलांच्या हस्ते गणफतीची आरती करण्याचा उपक्रम राबविला जात आहे.
त्यानुसार श्रीरामपूर ( जि. अहिल्यानगर) येथील आझाद मैदानातील पंचाहत्तर वर्षे पूर्ण करून यंदा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मानाच्या गणपतीची आरती एकल महिलांच्या हस्ते करून एकल महिलांना मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांना एकल महिलांसाठी करीत असलेल्या कार्याबद्दल मंडळाच्या वतीने सूर्यकांत सगम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी  मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य बाळासाहेब जपे, साऊ एकल महिला समितीचे मुकुंद टंकसाळे, गलांडे पाटील विद्यालयाच्या उपशिक्षिका कल्पना जानराव साळवे तसेच मंडळाचे पदाधिकारी मनोजकुमार नवले, सूर्यकांत सगम, अनिल छाबडा, इसाक पटेल, किशोर फाजगे, वैभव सूरडकर, प्रमोद पत्की, कुणाल करंडे, तेजस सूरडकर, संजीव पगारे आदी उपस्थित होते. श्रीपाद गोऱ्हे यांनी या विधी सोहळ्याचे पौरोहित्य केले.

सार्वजनिक गणेश मंडळाच्या मानाच्या गणपतीची आरती एकल महिलांच्या हस्ते करून एकल महिलांना मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!