अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे ‘ऍक्शन मोड’मध्ये;नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनचालकांना दणका

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरामध्ये काल नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर त्याचप्रमाणे मॉडीफाय सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्याखाली कारवाया करण्यात आल्या.शहरामध्ये अनेकदा मूळ कंपनीचे...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरामध्ये काल नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर त्याचप्रमाणे मॉडीफाय सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्याखाली कारवाया करण्यात आल्या.शहरामध्ये अनेकदा मूळ कंपनीचे सायलेन्सर बदलून विनापरवानगी मोठ्या कर्णकर्कश असे आवाज करणारे सायलेन्सर, फटाके फोडणारे सायलेन्सर गाड्यांना लावले गेलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना, वृद्ध नागरिकांना, महिलांना,लहान मुलांना त्याच्या आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागतो.अशा विना परवानगी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या तसेच नंबर प्लेट नसणाऱ्या ९७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.विना क्रमांकच्या गाड्या गुन्ह्यात वापरण्यात येत असल्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी ही धडक कारवाई केली असल्याचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले आहे.

विना नंबर प्लेटच्या गाड्या विविध गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर काल संपूर्ण शहरांमध्ये अशा वाहनांवर कारवाया करण्यात आल्या असल्याची माहिती वाघचौरे यांनी दिली.एकूण 97 वाहन चालकांवर या कारवाया काल केल्या त्यापैकी 48 विना नंबर प्लेट असणारी वाहने पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करण्यात आली. त्यांच्यावर मोटर वाहन कायद्याखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नंबर प्लेट जागेवरच टाकून घेण्याची देखील कारवाई करण्यात आली.याशिवाय मॉडीफाय सायलेन्सर असणारी 6 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली त्यांचे मॉडीफाय अर्थात विनापरवाना लावलेले सायलेन्सर काढून मूळ कंपनीचे सायलेन्सर बसवून त्या गाड्या सोडण्यात आल्या.यापुढे देखील शहरात सातत्याने अशी कारवाई करण्यात येणार आहे.सर्वच वाहन चालकांनी दोन्ही नंबर प्लेट सुस्थितीत  असल्याची खात्री करावी. त्याप्रमाणे मॉडीफाय सायलेन्सर कोणी वापरत असाल तर तात्काळ बदली करून मूळ कंपनीचे सायलेन्सर बसवावे अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ असल्याचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

जप्त करण्यात आलेल्या 6 दुचाकी.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!