गोळीबारातील मुख्य आरोपीसह तीन जण अटकेत;श्रीरामपूर पोलीस अखेर ऍक्शन मोडवर

श्रीरामपूर-छत्रपती शिवाजी रोडवर झालेल्या गोळीबाराच्या थरारानंतर श्रीरामपूर पोलिसांनी कारवाई करून मुख्य आरोपी हुजेफा शेखसह इतर दोन फरार आरोपींना जेरबंद केले आहे.शुक्रवारी...

श्रीरामपूर-
छत्रपती शिवाजी रोडवर झालेल्या गोळीबाराच्या थरारानंतर श्रीरामपूर पोलिसांनी कारवाई करून मुख्य आरोपी हुजेफा शेखसह इतर दोन फरार आरोपींना जेरबंद केले आहे.
शुक्रवारी दुपारी शिवाजी रस्त्यावरील गिरमे चौकात हुजेफा अनिस शेख याने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आता मुख्य आरोपी हुजेफा शेख याच्यासह गोरख जेधे आणि ऋषिकेश कांबळे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस प्रमुख सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचनांनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदेव भंवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत सापळा रचून हुजेफा शेखला बेड्या ठोकल्या. त्याचबरोबर विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या इतर दोन आरोपींनाही ताब्यात घेतले.पोलिसांच्या या तातडीच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल, तसेच पोलीस प्रशासनाच्या नव्या अॅक्शन प्लॅनमुळे कायदा व सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास अधिक बळकट होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!