अनधिकृत भोंग्यांविरोधात शिवसेना मैदानात;राष्ट्रीय श्रीराम संघाचे बेग यांची पोलिसांकडे कारवाईची मागणी

श्रीरामपूर-मशीदी व मदरशांवर बसवलेल्या अनधिकृत भोंगे व लाऊडस्पीकरद्वारे वाढत असलेल्या ध्वनीप्रदूषणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०२५ मध्ये दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन होत...

श्रीरामपूर-
मशीदी व मदरशांवर बसवलेल्या अनधिकृत भोंगे व लाऊडस्पीकरद्वारे वाढत असलेल्या ध्वनीप्रदूषणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०२५ मध्ये दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन होत आहे. पोलीस प्रशासनाने त्या निर्णयाचे काटेकोरपणे अनुपालन करावे तसेच अनधिकृत भोंग्यांपासून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणा विरुद्ध त्वरित कारवाई करावी या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाचे नेते सागर बेग यांनी दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,मुंबई उच्च न्यायालयाच्या क्रिमिनल रिट याचिका क्र. ४७२९/२०२१ यावर न्यायाल्याने दिलेल्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना,महानगरांतील संबंधित झोनच्या उपायुक्तांना आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांना ध्वनी प्रदूषण नियम 2000 च्या उल्लंघना संदर्भात सुनावणी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.मशिद व मदरशांवर अनधिकृत बसवलेल्या लाऊड स्पीकरद्वारे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे.त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या ४५ डेसिबलच्या मर्यादेचे उल्लंघन होत आहे.ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 38 व 136 अंतर्गत कारवाईसाठी तसेच सक्षम न्यायालयात तक्रार दाखल करण्यासाठी ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवाव्यात.पोलीस यंत्रणेने पोलीस अधिनियमाच्या कलमांतर्गत कारवाई करावाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भवर यांनी राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष शिंदे शिवसेनेचे नेते सागर बेग यांच्या हस्ते निवेदन स्वीकारले. याप्रसंगी जिल्हा प्रमुख सारिका राजेश वाव्हळ,सविता किशोर वाडीले,शहर प्रमुख समीर माळवे,सुनील शेळके,सुनील पाचोने,रवींद्र जाधव,किशोर वाडीले,अशोक तुपे, रोहित यादव, नितीन गाढे,मंगेश चव्हाण,नितीन क्षीरसागर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मशीदी व मदरशांवर बसवलेल्या अनधिकृत भोंग्याविरोधात कारवाई करावी या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.यावेळी बोलताना शिवसेना नेते सागर बेग.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!