श्रीरामपूरात थरार;भरदिवसा झाला गोळीबार;शहरासह तालुका हादरला

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजी रोडवरील गजबजलेल्या चहाच्या दुकानासमोर भर दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरासह तालुक्यातही मोठी खळबळ उडाली आहे.एका जणाने...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजी रोडवरील गजबजलेल्या चहाच्या दुकानासमोर भर दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरासह तालुक्यातही मोठी खळबळ उडाली आहे.एका जणाने राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्त्यावर गावठी पिस्तुल मधून दोन राउंड फायर केले.गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच गोंधळ उडाला.याप्रकरणी राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते संघर्ष बाळासाहेब दिघे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली आहे.त्यावरून पोलिसांनी हुजेफा अनीस शेख रा.वार्ड नं.२ श्रीरामपुर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109 सह आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संघर्ष बाळासाहेब दिघे, वय ३३ वर्षे, धंदा शेती व रियल इस्टेटकाम रा.भैरवनाथनगर होलेवस्ती ता.श्रीरामपुर यांनी या गोळीबार प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,मी शेती तसेच प्रॉपर्टी खरेदी विक्रीचे काम करत असून राष्ट्रीय श्रीराम संघाचा कार्यकर्ता म्हणुनही कामकाज करत असतो.आज दिनांक २९/०८/२०२५ रोजी दुपारी शहरातील शिवाजी रोडवरील गिरमे चौकातील ग्रज्युएट चहाच्या समोरील चायवाला यांच्या दुकानावर मित्रांसह चहा घेण्यासाठी थांबलो होतो. तेव्हा १ वाजेच्या सुमारास माझ्या ओळखीचा मित्र सोनु राठोड हा ग्रॅज्युयट चहा दुकानासमोर आला व त्याने मला तिकडे बोलविले.तेव्हा मी मित्र सोनु राठोड याच्याजवळ जावुन बोलत असताना त्याठिकाणी माझ्या ओळखीचा हुजेफा अनीस शेख रा.वार्ड नं.२ श्रीरामपुर हा आला.त्याने माझ्याकडे पाहुन कमरेला खोसलेला पिस्टल काढुन तो लोड करण्याचा प्रयत्न केला.तेव्हा मी घाबरुन त्याला धक्का देवुन खाली पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो खाली न पडता तेथुन बाजुला असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम जवळील बोळीतुन पळाला. हा सर्व गोंधळ माझ्या मित्रांनी पाहील्याने ते देखील माझ्याकडे पळाले. तेव्हा मी, तुषार कु-हे व इतर काही मित्र असे हुजेफा शेख याच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावलो असता त्याने पुढे पळत असताना पाठीमागे पाहुन माझ्या दिशेने त्याचेकडील पिस्तोलमधुन दोन गोळ्या फायर केल्या. तेव्हा आम्ही गल्लीतील भिंतीचा आडोशा घेत त्या गोळ्या चुकवल्या. त्यानंतर पुन्हा त्याचे मागे पळालो असता तो सैलानी बाबा दर्गाकडुन कोठेतरी पळून गेला. त्यानंतर  तेथे श्रीरामपुर पोलीस आले,असे फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा र.नं 0809/2025 नुसार भा.न्या.सं (2023) 109,शस्त्र अधिनियम (1959)3,25 अन्वये गुन्ह्यांची नोंद केली असून आरोपीचा शोध उपविभागीय पोलीस अधिकारी भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे घेत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!