शिरसगाव ग्रामसभेत प्रचंड गदारोळ;मंदिर अन अनधिकृत मस्जिदबाबत दुटप्पी भूमिकेवर वादंग

श्रीरामपूर-गावातील तमाम हिंदू ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा मंदिराला विरोध आणि अनधिकृत मस्जिद प्रश्नाबाबत शिरसगाव ग्रामपंचायत मधील सत्ताधारी मंडळींनी गप बसायची...

श्रीरामपूर-
गावातील तमाम हिंदू ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा मंदिराला विरोध आणि अनधिकृत मस्जिद प्रश्नाबाबत शिरसगाव ग्रामपंचायत मधील सत्ताधारी मंडळींनी गप बसायची भूमिका घेतली असली तरी त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रीय श्रीराम संघ कडाडून विरोध करणार असल्याचा इशारा शिरसगाव शाखा अध्यक्ष रोहित यादव यांनी दिला आहे. यादव यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावातील जलजीवन पाणी योजना व खंडोबा मंदिराचा प्रश्न उपस्थित करत ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत मशीदी आणि दर्ग्याबाबत आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.दरवर्षी स्वातंत्र दिनाच्या दिवशी लोकहिताच्या प्रश्नाबाबत गावात ग्रामसभा भरत असते.ही सभा वादळी आणि सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारी ठरली.
गुरुवारी दि.२१ रोजी हनुमान मंदिर सभा मंडपात झालेल्या ग्रामसभेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला.सभेच्या सुरवातीलाच ग्रामपंचायत सदस्य महेश ताके यांनी सरपंच हजर असताना सभेचे अध्यक्षपद दुसऱ्याने घेतले यावर आक्षेप घेतला. त्यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.त्यानंतर राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते निलेश गवारे यांनी जलजीवन योजनेचे पाणी खराब येत असलेबाबत उपास्थित केलेल्या प्रश्नावर अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने पुन्हा सभेत गोंधळ उडाला.जो पर्यंत पिण्यायोग्य पाणी येत नाही तो पर्यंत पाणीपट्टी कुणीही भरणार नाही असे गवारे यांनी ठणकावून सांगितले.राष्ट्रीय श्रीराम संघांचे शिरसगाव अध्यक्ष रोहित यादव यांनी अनधिकृत असलेल्या तीन मस्जिद व नव्याने ग्रामपंचायत शेजारी झालेल्या मस्जिद बांधकामावर प्रश्न उपस्थित केल्यावर एकच गोंधळ उडला.सर्वसामान्य जनतेला काही बांधकाम करायचे असल्यास पहिले  बांधकाम परवाना घ्यावा लागतो मग मस्जिद बांधकाम करायला ग्रामपंचायतने परवानगी का दिली असा प्रश्न रोहित यादव यांनी उपस्थित केला. श्रेयवादासाठी श्री खंडोबा मंदिराला विरोध कारायचा खटाटोप जर कोणी करत असेल तर यापूढे आक्रमक भूमिकेतच आवाज उठवला जाईल असा ईशाराही रोहित यादव यांनी ग्रामसभेत दिल्याने ग्रामस्थांनी त्यास पाठींबा व्यक्त केला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!