आमदार हिरामण खोसकर व सागर बेग यांचा त्र्यंबकेश्वरच्या महादेवाला अभिषेक

श्रीरामपूर-जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या पवित्र श्रीक्षेत्र त्र्यंबेकश्वर येथे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व सागर बेग यांनी असंख्य हिंदू धर्म प्रेमींच्या उपस्थितीत...

श्रीरामपूर-
जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या पवित्र श्रीक्षेत्र त्र्यंबेकश्वर येथे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व सागर बेग यांनी असंख्य हिंदू धर्म प्रेमींच्या उपस्थितीत पवित्र श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर महादेवाला अभिषेक घालून आपला देश हिंदू राष्ट्र व्हावे अशी मनोकामना व्यक्त केली.ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी व पावन गोदावरी नदीच्या उगमस्थानी असलेल्या पेशवेकालीन पवित्र श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात संपूर्ण भारतातून भाविकांची गर्दी असते.श्रावण महिन्यातील पवित्र अशा चौथ्या सोमवारचे औचित्य साधून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघांचे हिंदुत्ववादी आमदार हिरामण खोसकर यांच्या मतदार संघातील हिंदू धर्म बांधवांनी हा योग घडवून आणला. आमदार खोसकर यांच्या आमंत्रणाला मान देऊन शिवसेना नेते सागर बेग यांनी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना घेऊन त्र्यंबकेश्वरला आमदार खोसकर यांच्या उपस्थितीत महादेवाला अभिषेक घालून भारताला लवकर हिंदू राष्ट्र करण्याचे साकडे देवाला घातले.याप्रसंगी सागर बेग यांचा त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. तर आमदार खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर महादेवाची प्रतिमा भेट देऊन सागर बेग यांचा इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाच्या वतीने सन्मान केला.यावेळी संकेत भाऊ चव्हाण,लकी गोवर्धने,गणेश पठारे,तुषार थेटे, राष्ट्रीय श्रीराम संघांचे राहाता तालुकाध्यक्ष मदन भाऊ मोकाटे यांच्यासह राष्ट्रीय श्रीराम संघांचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीक्षेत्र त्र्यंबेकश्वर येथे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व शिवसेना नेते सागर बेग यांनी मनोभावे दर्शन घेतले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!