काँग्रेसकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी;मा.खा.विखे यांची टीका;भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची प्रचार सांगता सभा

श्रीरामपूर-काँग्रेसने दहशतवाद तसेच पोस्को आणि मोक्का सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणुकीत उमेदवारी दिली आहे, ही मोठी शोकांतिका आहे.अशा गुन्हेगारी...

श्रीरामपूर-
काँग्रेसने दहशतवाद तसेच पोस्को आणि मोक्का सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणुकीत उमेदवारी दिली आहे, ही मोठी शोकांतिका आहे.अशा गुन्हेगारी प्रवृतीच्या हाती पुन्हा श्रीरामपूर द्यायचे का, याचा विचार श्रीरामपुरकरांना करावा लागणार असून ही निवडणूक श्रीरामपूरच्या अस्मितेची निवडणूक आहे,असे प्रतिपादन मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपुर शहरातील शिवतीर्थ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांच्या प्रचार सांगता सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी,राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक,जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. सभापती दीपक पटारे, अनुराधा आदिक,संजय फंड,अशोक कानडे,इंद्रनाथ थोरात, नानासाहेब शिंदे यांच्यासह नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
मा. खा. डॉ. विखे पुढे म्हणाले की, नगरपालिका निवडणूकित महायुती तोडून खुर्चीसाठी आणि काँग्रेसला मदत व्हावी म्हणून काही अपशकुनी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.40 वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे निमित्त करून त्याचे भांडवल करून काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतः चा स्वार्थ साधला. आता पुतळा उभा राहिला. त्यामुळे आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते दुसऱ्या वर आरोप करत आहेत.श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या प्रश्नाचे ही असेच भांडवल करून त्यास विखे पाटील यांचा विरोध आहे असे भासवले जाते.15 वर्षांपासून हा रेडिओ लावून रस्त्यावर बसण्याचे काम केले जात आहे. आता नवीन स्वाभिमानी श्रीरामपूर अशी मोहीम शोधून काढली. श्रीरामपूरकर स्वाभिमानीच आहे परंतु तुमचे काय,तुम्ही तर श्रीगोंदयावरून आमदार आणले आहेत.
बेरोजगारांच्या हाताला काम आणि माताभगिनींना गुन्हेगारांपासून सुरक्षा मिळवून देणारी निवडणूक आहे.जातीपातीचे आणि हिंदू-मुस्लिम या मुद्द्यांचे भांडवल करून 40 वर्षे एका कुटुंबाने सत्ता भोगली. आता श्रीरामपूर च्या पुढील 25 वर्षांच्या भविष्यासाठी व विकासासाठी निर्णय घेण्याची वेळ आली आहे.जो निर्णय संगमनेर मध्ये घेतला गेला तो इथे घेण्याची गरज आहे.त्यामुळे आता ही शेवटची संधी अडून चूक करू नका,असे आवाहन मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी शेवटी केले.अविनाश आदिक म्हणाले की,या निवडणुकीत मतविभागणी टाळण्यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही दोन पावले मागे आलो परंतु काही जणांनी अपशकुन केला.ज्या नीच प्रवृत्तीच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांनी अद्यापपर्यंत माफी देखील मागितली नाही.त्यामुळे त्यांना निवडणूकित धडा शिकवावाच लागेल.विखे पाटलांमुळे संगमनेरच्या साहेबांनी सुद्धा धसका घेऊन काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणे टाळले,ही गंभीर घटना आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिक्रमण कारवाईत विस्थापित झालेल्यांचे 100 टक्के पुनर्वसन करण्याचा शब्द दिला असून तोपर्यंत कुणावरही कारवाई न करण्याचे आश्वासन देखील दिले असल्याचे आदिक यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी,दीपक पटारे, संजय फंड,अशोक कानडे यांचीही भाषणे झाली.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप वाघ  यांच्या सह अनेकांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुभाष त्रिभुवन यांनीही आपल्या पक्षाचा युतीला पाठिंबा जाहीर केला.

24 तास शुद्ध पाणी अन 100 दिवसांत खड्डेमुक्त शहर
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने 178 कोटींची पाणी पुरवठा योजना लवकरच कार्यान्वित करून श्रीरामपुर शहराला 24 तास शुद्ध पाणी पुरवठा करून 100 दिवसांच्या आत शहर खड्डेमुक्त करून दाखवू असे आश्वासन नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांनी दिले.

श्रीरामपुर येथील भाजप राष्ट्रवादी च्या उमेदवारांच्या प्रचार सांगता सभेत मार्गदर्शन करताना मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील. (छाया-अमोल कदम)
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!