विकासासाठी निधी कमी पडणार नाही-बिहाणी;पालकमंत्री विखे यांच्या साथीने शहराचे चित्र बदलण्याचा विश्वास

श्रीरामपूर-केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देंवेंद्र फडणवीस तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचेच असल्याने आपल्याला नगरपालिकेत निधी कमी पडणार नाही....

श्रीरामपूर-
केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देंवेंद्र फडणवीस तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचेच असल्याने आपल्याला नगरपालिकेत निधी कमी पडणार नाही. या शहराचे चित्र बदलण्यासाठी आपण भाजपला साथ द्यावी,असे आवाहन नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांनी केले.

शहरातील विविध प्रभागामध्ये आयोजित प्रचारादरम्यान ते नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. प्रभागातील प्रश्न नागरिक त्यांच्यासमोर मांडत आहेत. त्यानंतर नागरिकांच्या प्रश्नाला ते उत्तरे देताना सत्ता आल्यानंतर काय उपाययोजना केल्या जातील याचा लेखाजोखा मांडला जात आहे. बिहाणी म्हणाले, शहरातील विस्थापित अतिक्रमणधारकांचे पुर्नवसन करण्याला आपले प्राधान्या राहील. सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका तयार झाली आहे. पालकमंत्री विखे पाठीशी असल्याने रस्त्याची कामे करून शहर खड्डेमुक्त केले जाईल. समोर उभे असलेले उमेदवार सत्ताधारी पक्षाचे नसल्याने त्यांना निधी मिळविण्याची अडचण आहे. ते शहराचा विकास कसा करतील हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारावा. एक वर्षात मोठा निधी आताचे लोकप्रतिनिधी आणू शकले नाहीत. तर जे जिल्हा बँकेचे पाच वर्षांपासून संचालक आहेत त्यांनी काय काम केले, असा प्रश्नही बिहाणी यांनी उपस्थित केला.
शहराची पाणीपुरवठा योजना पालकमंत्री विखे यांच्यामुळे मंजूर झाली आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्याला आपले प्राधान्य आहे. आपण उद्योजक असल्याने येथील तरूणांच्या रोजगाराची समस्या माहिती आहेत. त्यादृष्टीने एमआयडीसीमध्ये मोठा प्रकल्प आणण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. शहरातील काही भागात चोऱ्या, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असून त्यासाठी प्रत्येक रस्त्यावर सीसीटिव्ही बसविले जातील,असे आश्वासन बिहाणी यांनी दिले.यावेळी प्रास्तविक अतुल वढणे यांनी केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!