श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीवर चर्चा;उपमुख्यमंत्री शिंदे यांची बेग यांनी घेतली भेट

श्रीरामपूर-आपल्याला भेटण्याची इच्छा घेऊन मुंबईत आलेला कोणताही शिवसैनिक न भेटता परत गेलाच नाही पाहिजे हाच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा शिरस्ता असून...

श्रीरामपूर-
आपल्याला भेटण्याची इच्छा घेऊन मुंबईत आलेला कोणताही शिवसैनिक न भेटता परत गेलाच नाही पाहिजे हाच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा शिरस्ता असून तो त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे प्रांजळ मत शिवसेना नेते तथा राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी व्यक्त केले.मुंबई येथील भेटीत श्रीरामपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाली असून ती श्रीरामपूर शहराच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीरामपुर येथून मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी व काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष सागर बेग व शिवसैनिक गेले होते. त्यांना दिवसभर कामाच्या व्यापातून वेळ देता न आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री तीन वाजता स्वतःच्या राहत्या घरी बोलावून घेतले आणि भेट देत दिलखुलास चर्चा केली. जवळपास एक तास सागर बेग यांच्याशी त्यांनी श्रीरामपूर व जिल्ह्यातील महत्वाच्या विषयांवर सविस्तरपणे चर्चा केली.चर्चे दरम्यान त्यांनी बेग यांना काही विषयांवर मार्गदर्शन देखील केले.श्रीरामपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत झालेली ही भेट श्रीरामपूर शहराच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिनीचे भाऊ तर गरजू रुग्णांना मदतीचा हात देणारे नाथ झाले आहेत. तेच शिंदे आपल्या सर्वसामान्य शिवसैनिकाला ही विसरलेले नाहीत.दिवसभर मंत्रालयात राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळून मध्यरात्री पर्यंत शिवसैनिकांनाही वेळ देणारे ते कुशल नेतृत्व आहे.मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक धडाकेबाज निर्णय आजही महाराष्ट्राला दिशादर्शक ठरत आहेत.लाडकी बहीण योजना ही त्यांचीच कल्पना.एकनाथ शिंदे यांनी याच योजनेच्या जोरावर आपल्या विरोधकांचा सुफडा साफ केला असल्याचेही सागर बेग यांनी स्पष्ट केले.

मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते सागर बेग यांनी भेट घेतली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!