मुंबईतून मराठा आरक्षण घेऊनच परतणार;जरांगे पाटील;अहिल्यानगर येथे कार्यकर्त्यांशी चर्चा

श्रीरामपूर-मराठा आरक्षणाचा लढा आता आरपार लढायचा असून मुंबईतून यावेळी मराठ्यांना आरक्षण घेऊनच परत यायचे आहे.त्यासाठी २९ ऑगस्टला प्रत्येक घरातून एक गाडी...

श्रीरामपूर-
मराठा आरक्षणाचा लढा आता आरपार लढायचा असून मुंबईतून यावेळी मराठ्यांना आरक्षण घेऊनच परत यायचे आहे.त्यासाठी २९ ऑगस्टला प्रत्येक घरातून एक गाडी घेऊन घराबाहेर पडावे आणि मुंबईत आपली ताकद दाखवावी असे आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी अहिल्यानगर येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी प्रसंगी केले.काल अहिल्यानगर येथील सरकारी विश्रामगृह येथे मनोज जरांगे पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेऊन चर्चा केली. श्रीरामपूर येथील अखंड मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी मुंबईच्या आंदोलनासंदर्भात बातचीत करून आंदोलनाची रूपरेषा जाणून घेतली. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, इतरांना आरक्षण मिळाले.त्यावेळेस आम्ही कोणाला विरोध केला नाही,आम्ही भेदभाव करत नाही.आमची मुलं तशी त्यांची मुलं अशी भूमिका आम्ही ठेवतो. मग आमच्या मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळत असेल तर त्याला इतरांनी विरोध करण्याचे कारण नाही. ओबीसी मधील जाती १०८ वरून ५०० च्या पुढे गेल्या तरी आम्ही काही म्हटलो नाही. ओबीसी त पाच-सहा जाती अशा आहेत की,त्यांना ओबीसीचे नाही तर एस.सी.च्या सवलती मिळतात. विशेष म्हणजे या सवलती त्यांचे नेतेच घेतात. त्यांच्या जातीच्या गोरगरिबांना ते मात्र या सवलती देत नाहीत असा आरोप यावेळी जरांगे यांनी केला. सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाला दीड वर्ष उलटून गेले सरकारला आणखी किती वेळ द्यायचा? मराठा म्हणजेच कुणबी या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम असून मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळवण्याची आता हीच वेळ आहे. माझी तब्येत साथ देत नाही, मी काही दिवसांचा कदाचित तुमचा सोबती असेल,परंतु मला मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळूनच द्यायचे आहे. काही झाले तरी २९ तारखेला आपण मराठ्यांना आरक्षण घेऊनच परत येऊ,त्यासाठी सर्वांनी मुंबईकडे कूच करावी. त्यासाठी प्रत्येक घरातून एक गाडी याप्रमाणे गावोगावातून बाहेर पडून मुंबईत लाखोंच्या संख्येने आपल्याला हजेरी लावायची असल्याचे यावेळी मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.अखंड मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने अहिल्यानगर येथील जरांगे यांच्या पदयात्रेदरम्यान एक लाख लोकांना जेवणाचे नियोजन केले होते. श्रीरामपूरातून आरक्षणासाठी कॅन्डल मार्च काढला होता,एवढेच नव्हे तर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण,साखळी उपोषण श्रीरामपुरात करण्यात आले होते.त्याला सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाठिंबा दर्शवला होता.तसेच नुकताच गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमही घेतल्याची माहिती देत ॲड.बाळासाहेब आगे यांनी श्रीरामपूर अखंड मराठा समाजाचे  कामकाज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडले.अखंड मराठा समाज श्रीरामपूरने आतापर्यंत केलेल्या कामाचा गौरव करत जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आंदोलनात श्रीरामपूरच्या सर्व लोकांनी पुढाकार घेऊन नियोजन करत मुंबई चा लढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.मुंबईच्या आंदोलनात संदर्भात गावोगावी तसेच शहरात बैठका घेऊन “चलो मुंबई”चे नियोजन करू असे आश्वासन यावेळी श्रीरामपूरच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना दिले.यावेळी अखंड मराठा समाज श्रीरामपूरचे मराठा सेवक सुरेश कांगुणे,कामगार नेते नागेश सावंत,शरद अंबादास नवले,दत्तात्रय जाधव,अमोल बोंबले,सुधाकर तावडे, ऋषिकेश मोरगे,युवराज आगे,रोहित भोसले,युवराज नानासाहेब गलांडे,सतीश नाईक,गोकुळ भालदंड, मनोज बोडखे,नवनाथ गायके,सुनील ताके आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर येथील अखंड मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!