दिव्यांग बांधवांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची ऊर्जा मिळणार-तहसीलदार मिलिंद कुमार वाघ;दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय व कॅलिपर्सचे मोफत वितरण शिबीर

श्रीरामपूर-
आजच्या या शिबिराच्या माध्यमातून जे दिव्यांग बांधव कुणाच्या तरी मदतीने चालत होते.त्यांना स्वतःचा पाय आणि हात मिळणार आहे, ही एक मोठी आनंदाची बाब आहे.आज या शिबिराच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची ऊर्जा मिळणार आहे.स्वबळावर स्वतःचे काम करण्याचा आनंद हा अद्वितीय आहे,असे प्रतिपादन तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी केले.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलीमको) कानपूर,एस. आर.ट्रस्ट,रोटरी मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर,अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर,आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र,पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थीव्यंग, दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय बसविणे व कॅलिपर्स मोजमाप आणि तात्काळ मोफत वितरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार मिलिंद कुमार वाघ पुढे म्हणाले की,आजच्या शिबिरात दिव्यांगांचे मोजमाप घेऊन त्वरित साहित्य वाटप केले जाणार आहे. संजय साळवे सरांनी या संदर्भात खूप मेहनत घेतलेली आहे.आमच्याकडून ते नेहमी काम करून घेतात.सर्व विभागाकडून काम करून घेण्याची कला त्यांना आत्मसात आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये दिव्यांगांचा उत्साह व वाखानण्यासारखा होता.महसूल किंवा इतर कुठल्याही विभागाचे प्रश्न घेऊन या,ते त्वरित सोडविले जातील अशी ग्वाही तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी दिली.आज प्रथमत:च दिव्यांगांसाठी मोजमाप व तात्काळ साहित्य वाटप करण्याचे काम सर्व संयोजन संस्था आणि शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केले आहे.प्रशासनामार्फत विविध योजना दिव्यांगाकरीता राबवीली जातात.पंचायत समिती मार्फत दिव्यांग व्यक्तींकरीता स्थानिक स्वराज्य संस्थेत पाच टक्के निधी ग्रामपंचायत मार्फत व पंचायत समितीच्या माध्यमातून दिव्यांगा करिता वितरित केला जातो.त्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात.त्याचा लाभ दिव्यांग बांधवांनी घ्यावा असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी केले.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अलिंमको टीमचे प्रमुख यश चुंबळे,सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष म्हस्के,मनसुखलाल चोरडिया,अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड,रोटरी एजुकेशन ट्रस्टचे खजिनदार विनोद पाटणी,जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे तालुका समन्वयक संजय साळवे, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी, आसान दिव्यांग संघटनेचे मुस्ताकभाई तांबोळी,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे पीओ बाळासाहेब सातपुते, प्रमोद आडे प्रफुल गवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी दिव्यांग बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती. साहित्य मिळाल्याचा आनंद प्रत्येक दिव्यांगांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.उपस्थित सर्व मान्यवरांचे ‘एक पेड मा के नाम’ या कार्यक्रमांतर्गत विविध औषधी रोपे देऊन सत्कार करण्यात आला.दिव्यांग बांधवांना रोपे वितरित करून सामाजिक वनीकरणाचा संदेश देण्यात आला.याप्रसंगी श्री. चोरडिया यांच्यातर्फे मूकबधिर विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक संजय साळवे यांनी केले.तर आभार दीपक तरकासे यांनी मांनले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे मंगेश सालपे,सौ.कौशल्य जाधव, सुरज गायकवाड,नागनाथ शेटकर,मुकिंद गाडेकर,सुनील कानडे,विश्वास काळे,सौ.स्नेहा कुलकर्णी,सौ.वक्ते,वंदना उदमले, कुसुम शितोळे,मूकबधिर विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

अस्थीव्यंग, दिव्यांगांसाठी कृत्रिम हातपाय बसविणे व कॅलिपर्स मोजमाप आणि तात्काळ मोफत वितरण शिबीर प्रसंगी मार्गदर्शन करताना तहसीलदार मिलिंद कुमार वाघ.

Leave a Comment

संबंधित बातम्या

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

Latest News

Trending News