पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा-पालकमंत्री विखे पाटील यांच्या सूचना;श्रीरामपूर शहराच्या १७८ कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कामाची पाहणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहराची गरज लक्षात घेवून महायुती सरकराने वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली आहे. १७८ कोटी रुपयांच्या निधीतून कार्यान्वित होणाऱ्या पाणी...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहराची गरज लक्षात घेवून महायुती सरकराने वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली आहे. १७८ कोटी रुपयांच्या निधीतून कार्यान्वित होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करा आशा सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागां मधील विकास कामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.पालिकेच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहाणी त्यांनी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत केली.महायुती सरकारने या योजनेच्या कामाला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून १७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.२०५१ सालची  लोकसंख्या गृहीत  २६.३६ दक्ष लक्ष लिटर पाणी प्रतिदीन  लागण्याची शक्यता गृहीत धरून योजनेचा  आराखडा तयार करण्यात आला आहे.सद्य परिस्थितीत जल शुध्दीकरण केंद्राचे आर सी सी डिझाइन प्रमाणे फिल्टर बेडचे खोदकाम पूर्ण झाले असून दगडी सोलिंग व क्राॅकींटचे काम प्रगती पथावर असल्याची माहीती मुख्याधिकारी मच्छीद्र घोलप  यांनी सांगितले.पाणी योजनेतील नवीन उंच जलकुंभ काम जुन्या टाकीचे बांधकाम पाडल्यानंतर हाती घेण्यात येणार असून,वितरण व्यवस्थैसाठी ५९ कि.मी.पाइप लाइनच्या कामापैकी १७ कि.मी.पूर्ण काम पूर्ण झाले असल्याचे या पाहाणी दरम्यान सांगण्यात आले.पाणी योजने करीता तलावाचे सर्वेक्षण पूर्ण करून बोअर कोअर चाचणी करण्यात आली आहे.तलावाचे खोलीकरण हे निर्धारीत वेळेत पूर्ण करून आर. सी.सी.काम करण्यात येणार आहे.तलावात आर सी सी काम पूर्ण झाल्यानंतर तळातील मातीचा थर प्लस्टिक शीट वाळूचा थर इत्यादी काम पूर्ण करण्यासाठी दोन महीन्याच्या कालावधी लागणार आहे.योजनेतील सर्व काम कोणत्याही त्रृटी राहाणार नाहीत अशा पध्दतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.वाढीव पाणी पुरवठा योजना शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने सामाजिक भावना लक्षात घेवून योजनेचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याची काळजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील एकूण पाच प्रभागात भूमीपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम संपन्न झाले.ठिकठिकाणी नागरीकांशी संवाद साधून मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांच्या समस्या तसेच विकास प्रक्रीयेबाबत असलेल्या सूचना जाणून घेतल्या.भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,मा सभापती दीपक पटारे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, माजी नगराध्यक्ष संजय फंड, केतन खोरे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, शरदराव नवले, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांमधील विकास कामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

चौकट
‘शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण योजना’
योजनेतील सर्व काम कोणत्याही त्रृटी राहाणार नाहीत अशा पध्दतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.वाढीव पाणी पुरवठा योजना शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने सामाजिक भावना लक्षात घेवून योजनेचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याची काळजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!