श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या निवासस्थानी गावातील मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला. त्यांच्या निवडीबद्दल त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी अशोक सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळूंके,अशोक चे कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे,मार्केट कमिटीचे संचालक मयूर पटारे, ग्राम सदस्य सुनील बोडखे,उत्तमराव पवार,विलास दाभाडे,माजी चेअरमन एकनाथ पटारे,आबासाहेब ढूस,अशोक पवार,लहानभाऊ पवार,सुभाष ब्राह्मणे ,डॉ.किशोर हुळहुळे,भाऊसाहेब पवार,मच्छिंद्र पटारे,संपत कांबळे,गणेश पवार,अमोल पवार, गोरख पटारे आदी उपस्थितीत होते.उपस्थित सर्वांनी अशोकचे नूतन व्हा.चेअरमन आदिनाथ झुराळे यांचे अभिनंदन केले.सत्कार समारंभानंतर स्नेहभोजनचे आयोजन करण्यात आले होते.
