श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील चार तरुणांना बुधवार दि.3 रोजी दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली.एकाच वेळी सात ते आठ ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाई मुळे श्रीरामपूर सह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे चौघे तरुण पाकिस्तानातील गँगस्टरशी सोशल मीडियावरून संपर्कात होते.शेहेजाद भट्टी आणि राणा गटाशी या सर्वांचा संपर्क सुरू असल्याने संबंधित तरुणांची चौकशी करून त्यांना नंतर तात्पुरत्या स्वरूपात सोडून दिले असले तरी या प्रकरणी पुढील चौकशी सुरू च राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.चौघे तरुण शहरातील एका विशिष्ट भागाशी संबंधित असल्याने या कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात आली होती.
जिल्ह्यातील हिंदुत्ववादी नेते व कार्यकर्ते यांच्याशी संबंधित माहिती या तरुणांकडून संकलित करण्यात आल्याचा एटीएस ला संशय असून ताब्यात घेतलेल्या चौघांचाही पाकिस्तान मधील गॅंगस्टर शेहेजाद भट्टी आणि राणा गटाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क आल्याने त्यांची एटीएसने कसून चौकशी केली.या चौघांनी शहरातील काही प्रमुख ठिकाणांची रेकी करून ती माहिती पाकिस्तानातील या गँगस्टरला पुरवली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
