डॉ.सुजय विखे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न का होतोय हे अनाकलनीय; पालकमंत्री विखे पाटील यांची खंत

श्रीरामपूर- जिल्ह्यात भाजप पक्षाची घडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी व्यवस्थित बसवली आहे.दक्षिणेतून विधानपरीषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उत्तरेत आमदार सत्यजित...

श्रीरामपूर-

जिल्ह्यात भाजप पक्षाची घडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी व्यवस्थित बसवली आहे.दक्षिणेतून विधानपरीषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उत्तरेत आमदार सत्यजित तांबे आणि आमदार विवेक कोल्हे यांना पक्षाने योग्य संधी दिली असून मा. खा.डॉ. सुजय विखे यांच्या बाबत विनाकारण काही लोक अशा  वावड्या का उठवतात? हे आपल्याला समजत नाही, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.दरम्यान,आमदार विवेक कोल्हे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, विखे कुटुंबाला नेहमीच टोकाचा विरोध सहन करावा लागलेला आहे. राजकारणात टीका ही होतच असते,परंतु पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांशी उत्तम संवाद ठेवून निर्णय घेत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील हे बोलत होते.आ. विवेक कोल्हे यांनी केलेल्या टिकेवर आणि विधानपरिषद उमेदवारी बाबत सुजय विखे यांच्या नावाच्या चर्चेबद्दल त्यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले.मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, डॉ. सुजय विखे यांनी विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत उमेदवारी अर्ज भरलेला नाही किंवा त्यांनी तशी कुठल्याही प्रकारची पक्षकडे मागणीही केली नाही.सुजय विखेंच्या नावाची शिफारस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये करण्यात देखील आलेली नाही,तरीही विनाकारण काही लोक अशा वावड्या उठवत असून सुजय विखे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न का केला जातो आहे, हे समजायला मार्ग नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात पक्षाची घडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी व्यवस्थित बसवली असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!