जाफराबाद शिवारातील बेकायदा वाळूउपशावर पोलिसांची कारवाई;हायवा,जेसीबीसह ७३ लाखाचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद आणि जुने नायगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन हायवा, एक...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद आणि जुने नायगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन हायवा, एक जेसीबी मशीन व सुमारे १२ ब्रास वाळूसह एकूण ७३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रीरामपूर तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोमवार (दि.१८) रोजी सायंकाळी जाफराबाद शिवारातील गोदावरी नदीपात्रात पोलिसांनी एक कारवाई केली.या प्रकरणी पोलिस हवालदार रामेश्वर ढोकणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून ३० लाख ६० हजारांचे दोन विना नंबरचे ट्रक आणि ६ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या प्रकरणी बापू चिखले, योगेश घंगाळे, विशाल निकम व विजय कुंजीर (सर्व रा. वैजापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून ते सर्व फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.दुसरी कारवाई गुरुवारी (ता. २१) दुपारी जुने नायगाव शिवारात करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे पोलिस हवालदार सुनील शिंदे यांच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने हायवा डंपरमध्ये बेकायदा वाळू भरताना आरोपींना पकडले. या कारवाईत ४२ लाख ६० हजार रुपये किमतीचा हायवा डंपर, एक जेसीबी मशीन आणि ६ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपी शुभम भाऊसाहेब पवार (रा. श्रीरामपूर) आणि सुरेश सुदाम आहेर (रा. सावळी विहीर) यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!