श्रीरामपूरातील डॉक्टर व दोन एजंटना पोलिसांकडून अटक;बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी प्रकरण

श्रीरामपूर-राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भ लिंग निदान प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी श्रीरामपूर येथील डॉक्टर व दोन एजंटना अटक...

श्रीरामपूर-
राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भ लिंग निदान प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी श्रीरामपूर येथील डॉक्टर व दोन एजंटना अटक केली आहे.पुण्यात अन्यही काही डॉक्टर, एजंट यात सामील असण्याची शक्यता असून त्याबाबताही पोलिसांकडून बारकाईने तपास सुरु आहे. यातील एजंट प्रदीप ढगे याच्याकडे लिंग निदान चाचणी करणारे आणखी एक मशीन मिळून आले असून ते देखील पोलिसांनी जप्त केले आहे. लिंगनिदान चाचणी करणारे डॉक्टर,एजंट, दलाल यांच्यावर त्याचप्रमाणे संबंधित महिलेच्या कुटुंबीयांवर एवढ्या मोठ्या संख्येने अटक करून केलेली ही राज्यातील पहिलीच कारवाई असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दि.२९/०४/२०२६ रोजी सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने पिंपरी निर्मळ शिवारात, ता. राहाता येथील निळवंडे कॅनॉल शेजारी जावुन सापळा रचुन तेथे छापा टाकुन सदर ठिकाणावरुन डॉ. राहुल आबासाहेब भनगे, वय ३४ वर्ष, धंदा बी.ए.एम.एस. डॉक्टर, रा. भानसहिवरे, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर, अभिजीत दिलीप भुसाळ, वय ३० वर्ष, धंदा- जे.एन.एम. नर्सिंग, रा. पिंपरी निर्मळ, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांना २४,०९,१००/- रुपयांच्या किं.चा मुददेमालसह अटक करण्यात आली होती.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदार मार्फत २ एजंट प्रदिप भाऊसाहेब ढगे, वय ३२ वर्ष, रा. कोहऱ्हाळे, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, निलेश ज्ञानेश्वर भवर, वय ४२ वर्ष, रा. नपावाडी ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांचाही सहभाग असल्याचे समजले. म्हणुन अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पथक व लोणी पोलीस स्टेशन यांच्या सयुक्त कारवाईने सदर दोनही इसमांना शिताफीने ताब्यात घेवुन लोणी पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपीस चौकशी केली असता त्यांनी श्रीरामपुर येथील डॉ.रविंद्र कुटे यांचाही यात सहभाग असल्याचे सांगीतल्याने सदर आरोपी डॉ. रविंद्र कुटे रा.श्रीरामपुर यांनाही सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

तसेच त्यांचे अटकेमुळे सदर गुन्हयात आणखी काही एजंट व डॉक्टरांचा सहभाग असल्याची दाट शक्यता असुन त्याचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.यातील नव्याने अटक केलेल्या तीनही आरोपींना आज राहता कोर्टापुढे हजर गेले असता तिघांनाही  3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
सदरची कारवाई ही मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर, मार्गदर्शनाखाली स.पो.नि. युवराज आठरे, पो.स.ई. आशिष चौधरी, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.हे.कॉ. संदिप दरंदले, पो.कॉ. अशोक गाडे, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.हे.कॉ. असिर सय्यद, पो.हे.कॉ. साईनाथ राशिनकर, पो.ना. सचिन शेवाळे, पो.कॉ. भोईटे, म.पो.कॉ. मनिषा गिरी यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!