बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करणारी टोळी जेरबंद;24 लाखांचा मुद्देमाल जप्त;अपर पोलीस अधीक्षक यांची धडक कारवाई

श्रीरामपूर-पिंपरी निर्मळ, ता. राहाता परिसरात निळवंडे कॅनॉल शेजारी असलेल्या एका खोलीमध्ये महिलांकडुन १० हजार रुपये घेवून त्यांची बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी...

श्रीरामपूर-
पिंपरी निर्मळ, ता. राहाता परिसरात निळवंडे कॅनॉल शेजारी असलेल्या एका खोलीमध्ये महिलांकडुन १० हजार रुपये घेवून त्यांची बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करणारी टोळी पोलिसांनी पकडली असून या कारवाईत पोलिसांनी 24 लाख 9 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी डॉ. स्वाती गोपळराव पवार, वैदयकीय अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय लोणी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरुन लोणी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६५/२०२६ महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीश्नल अॅक्ट १९६१ चे कलम ३३,३३ (अ), ३६ सह गर्भधारणापुर्व आणि प्रसुतिपुर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंधक कायदा सन १९९४ चे कलम ३(३),३ (अ), ३ (ब), ६(१)६ (२),६(३),१८,२३(१),२४,२५,२६ सह भा.न्या.सं. कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात डॉक्टर त्यांचे एजंट यांसह एकुण ९ आरोपिंना अटक असुन करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
दि.२९/०४/२०२६ रोजी सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर यांना गोपनिय बातमी मिळाली की, काही इसमांकडुन पिंपरी निर्मळ शिवारात, ता. राहाता येथील निळवंडे कॅनॉल शेजारी असलेले खोलीमध्ये महिलांकडुन १०,०००/- रु. घेवून त्यांची बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या कार्यालयाचे पथक लोणी पोलीस स्टेशनच्या पोलिसांबरोबर सदर ठिकाणी पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी बनावट गरोदर महिला ग्राहक म्हणुन पाठवुन खात्री करत सापळा रचला.
त्यानुसार नमुद पथकाने सदर ठिकाणास चारही बाजुन घेरुन तेथे छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन खोल्यांचे घर व त्यासमोर एक पत्र्यांची पडवी असुन आतील खोलीमध्ये २ पुरुष व बनावट महिला पोलीस ग्राहक मिळुन आले. सदर इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे डॉ. राहुल आबासाहेव भनगे, वय ३४ वर्ष, धंदा बी.ए.एम.एस. डॉक्टर, रा.भानसहिवरे, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर,अभिजीत दिलीप भुसाळ, वय ३० वर्ष, धंदा- जे.एन.एम. नर्सिंग, रा. पिंपरी निर्मळ, ता. राहाता, जि. अहिल्यानगर असे सांगीतले. आम्ही गरोदर महिलांकडुन प्रत्येकी १०,००० रुपये घेवुन त्यांची यु.एस.जी. मशीनचे साहयाने गर्भलिंग तपासणी करुन गर्भ मुलाचा आहे की मुलीचा याची त्यांना माहिती देतो असे सांगितले.गर्भवती महिलांना आमच्याकडे तपासणी करीता एजंट अभिजीत भुसाळ याने आणले असल्याचे आरोपी डॉक्टर यांनी सांगीतले. तसेच तेथील गर्भलिंग निदान करण्याकरीता आलेल्या ८ महिलांकडे चौकशी केली असता त्या महिला बीड, संगमनेर, नाशिक, नांदगाव, पुणे येथुन त्यांचे नातेवाईकासह आल्याचे समजले.

दरम्यान घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असुन त्या ठिकाणी ४,५०,००० रुपयांचे जेल व मशीन, टीशु पेपर, ४ मोबाईल फोन, ५९,०००/- रुपये रोख रक्कम, कागदी चिठ्या, एक सिल्वर रंगाची स्विफ्ट कार नं. एम.एच.१२ एच.व्ही. ९४३६, एक पांढरे रंगाची इटिंगा कार नं.एम.एच.१४ एच.डब्लु. ८६४२, एक लाल रंगाची वॅगनर कार एम.एच.१७ सी.आर ४१६० असा एकुण २४,०९,१००/-किं.चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
८ महिलांचे प्रवरा मेडीकल ट्रस्ट, हॉस्पीटल लोणी येथे वैदयकीय तपासणी केली असता त्या गरोदर असल्याचे आढळून आले आहे. सदर महिलांचे नातेवाईक / पती यांना ताब्यात घेवुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हयातील आरोपी १) डॉ. राहुल आबासाहेब भनगे, वय ३४ वर्ष, धंदा बी.ए.एम.एस. डॉक्टर, रा.भानसहिवरे, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर २) अभिजीत दिलीप भुसाळ, वय ३० वर्ष, धंदा- जे.एन.एम.नसिंग, रा.पिंपरी निर्मळ, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांना अटक केली आहे.
सदरची कारवाई ही मा.श्री. सोमनाथ घार्गे साो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर, मार्गदर्शनाखाली स.पो.नि. युवराज आठरे, पो.स.ई. आशिष चौधरी, म.पो.स.ई. कोमल कुमावत, म.पो.स.ई. बेबी आण्णा शिंदे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.हे.कॉ. संदिप दरंदले, पो.हे.कॉ. सचिन धनाड, पो.कॉ. अशोक गाडे, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.हे.कॉ. असिर सय्यद, पो.हे.कॉ. साईनाथ राशिनकर, पो.ना. सचिन शेवाळे, पो.कॉ. भोईटे, म.पो.कॉ. मनिषा गिरी यांनी केली आहे.

सर्व 9 आरोपीना आज रोजी कोर्टापुढे हजर केले असता सर्व आरोपींना राहता न्यायालयाने  पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.यातील अटक डॉक्टर व एजंट यांनी यापूर्वी अश्या किती लिंग निदान चाचण्या केल्या आहे? त्यासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कुठून बेकायदेशीरपणे खरेदी केले आहे? बाहेर जिल्ह्यातील गरोदर महिलांना याबाबतची माहिती कशी व कोणामार्फतिने दिली? यापूर्वी च्या गरोदर महिलांचे संबंधाने गर्भलिंग निदान केले असेल त्यात पुढे काय झाले?अशा विविध बाबींवर पोलीस कोठडी दरम्यान तपास करण्यात येईल,अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!