भंडारदरा धरणामुळे जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक क्षेत्रात परिवर्तन -जलसंपदामंत्री विखे पाटील

श्रीरामपूर-जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक क्षेत्रात भंडारदरा धरणामुळे मोठे परिवर्तन झालेले आहे.त्यामुळे भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सांस्कृतिक व निसर्ग पर्यटनातून साजरे करण्याच्या...

श्रीरामपूर-
जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक क्षेत्रात भंडारदरा धरणामुळे मोठे परिवर्तन झालेले आहे.त्यामुळे भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सांस्कृतिक व निसर्ग पर्यटनातून साजरे करण्याच्या दृष्टीने सर्वकष कृती आराखडा तयार करावा अशा सूचना जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. विधान भवनात या आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे व स्वप्नील काळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष ऐतिहासिक असून, या निमित्ताने राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे.जलाशय परिसराचे सुशोभीकरण, सांस्कृतिक व पर्यटन विकासातून हे वर्ष साजरे करण्यासाठी जलसंपदा विभागाने विशेष आराखडा तयार केला आहे. हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांसमोर सादर करून त्यास मान्यता घेतली जाणार असल्याचे मंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.या धरणामुळे जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मोठे परिवर्तन झाले असून हे बदल नव्या पिढीसमोर सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शताब्दी महोत्सवाचा स्वतंत्र लोगो तयार करावा व प्रत्येक महिन्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करून वर्षभर हा उत्सव साजरा करावा. यात स्थानिक कलाकारांना संधी देऊन त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत. तसेच, पर्यटकांना आकर्षित करणारे पाण्यावर आधारित उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सुचवले.या महोत्सवाची व्याप्ती धरणापासून ते अंतिम चारीपर्यंत असावी. याशिवाय स्वतंत्र वेबसाईट तयार करून समाजमाध्यमांद्वारे या शताब्दी वर्षाची व्यापक प्रसिद्धी व प्रसार करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!