काँग्रेसचे संपूर्ण बहुमत असलेली श्रीरामपूर एकमेव नगरपालिका-आ.ओगले;नगराध्यक्ष करण ससाणे यांनी स्वीकारला पदभार

श्रीरामपूर-पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात श्रीरामपूरची नगरपालिकाअशी एकमेव नगरपालिका आहे, जिथे काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमताने निवडून आलेला आहे.अटीतटीच्या निवडणुकीमध्ये करण ससाणे हे...

श्रीरामपूर-
पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात श्रीरामपूरची नगरपालिका
अशी एकमेव नगरपालिका आहे, जिथे काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमताने निवडून आलेला आहे.अटीतटीच्या निवडणुकीमध्ये करण ससाणे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.नऊ वर्षांपूर्वी श्रीरामपूर मध्ये चूक झाली होती,ती चूक यावेळी श्रीरामपूरकरांनी दुरुस्त केली,असे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले .
श्रीरामपूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष करण ससाणे यांनी काल सर्व धर्मगुरू तसेच माजी नगराध्यक्ष राजश्रीताई ससाणे,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, अंजूम शेख,भारती कांबळे,दत्तात्रय सानप,मुन्ना पठाण,सभापती सुधीर नवले,ज्ञानेश्वर मुरकुटे, वंदना मुरकुटे,दिपाली ससाणे व नुतन नगरसेवकांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार ओगले बोलत होते.आ. हेमंत ओगले पुढे म्हणाले की प्रत्येकाने निवडणूकित मोलाचे सहकार्य केले आहे.ज्यांनी समोर येऊन साथ दिली, काहींनी मागे राहून आम्हाला सहकार्य केले.निवडणुकीच्या काळामध्ये काही मतभेद किंवा मनभेद, गैरसमज झाले असतील ते सर्वजण विसरून जाऊ. आपण श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी सर्वजण एकत्रित येऊन येणारा पुढच्या पाच वर्षांमध्ये श्रीरामपूर परत एकदा स्वर्गीय जयंत ससाणे हे नगराध्यक्ष असताना जी परिस्थिती होती तशी आपण सर्वजण मिळून आणू.
नूतन नगराध्यक्ष करण ससाने यावेळी म्हणाले की,आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे,श्रीरामपुरातील तमाम स्वाभिमानी जनतेच्या आणि संघटनेच्या सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ व सर्व माता भगिनी यांनी जे कष्ट घेतले त्या सर्वांच्या मदतीने आपण निवडून आलो.इथून पुढच्या आपल्या काळामध्ये आपण सगळे मतभेद विसरून श्रीरामपूरचा विकास एवढे एकमेव ध्येय समोर ठेवून, सगळ्यांना बरोबर घेऊन श्रीरामपूरचे नाव राज्यांमध्ये नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न करू.आपल्याला पूर्वीचे वैभवशाली श्रीरामपूर परत निर्माण करायचे आहे.या कामी सर्वांनी पुढेही साथ द्यावी असे आवाहन ससाणे यांनी केले.
याप्रसंगी सर्वधर्म गुरुंचे आशिर्वाद घेण्यात आले.
ह.भ.प.वीर महाराज,शिख समाजाचे ग्यानी मिस्कीनजी,
ख्रिस्ती समाजाचे फादर प्रकाश भालेराव, बौद्ध धर्मगुरु तसेच मौलानांचे संदेश नगरसेवक मुझफ्फर शेख यांनी वाचून दाखवले.तत्पूर्वी करण ससाणे यांचे नगरपालिकेजवळ आगमन होताच ढोलताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकांवर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. नगरपालिका प्रांगणात प्रवेश करताच त्यांनी प्रथमतः शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.प्रशासक तथा प्रांतधिकारी किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवले.यानंतर यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पुढील सोहळा पार पडला.कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे नगरपालिकेचे पक्षप्रतोद मुजफ्फर शेख यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. तर आभार नगरसेवक राजेंद्र पवार यांनी मानले.

जनसंपर्क कार्यालय पुन्हा ‘त्याच’ ठिकाणी         माजी आमदार जयंत ससाणे यांच्या काळात नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या हॉलमध्ये जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले होते.मा.नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी निवडून आल्यानंतर ते कार्यालय बंद करून तेथे पाणीपुरवठा विभागाला जागा दिली होती.मात्र काल पुन्हा एकदा त्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात येऊन पाणीपुरवठा विभाग दुसरीकडे हलवण्यात आला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!