श्रीरामपुरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू;आ.ओगले आणि नगराध्यक्ष ससाणे यांचा पुढाकार

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते नगरपालिका निवडणूक संपताच आमदार...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते नगरपालिका निवडणूक संपताच आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना देत खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. लगेचच नगरपालिकेने मुख्य रस्ता असलेल्या मेन रोडवरील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम चालू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावेळी बोलताना आमदार ओगले म्हणाले की, निवडणुकीतील राजकीय मतभेद बाजूला ठेवून श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून नगराध्यक्ष करण ससाणे यांना सोबत घेऊन शहरातील महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहे.
नगराध्यक्ष ससाणे म्हणाले की, श्रीरामपुरातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असून यासाठी आमदार हेमंत ओगले यांच्या माध्यमातून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. सध्या शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, पंडीतमामा बोंबले, नगरसेवक राजेंद्र पवार, योगेश जाधव, अहमदभाई जहागिरदार,  दिपक वमने, दिपक चव्हाण, अशोक उपाध्ये, बिट्टू कक्कड,रवि खिल्लारी, कांतीशेठ पटेल, सुभाष पोटे,सागर भागवत, प्रसाद चौधरी, अभिजित लिप्टे, सिद्धार्थ लिप्ते, विलास लबडे, प्रविण नवले, अशोक शिवरकर, रियाज पठाण यांच्यासह आदि उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!