मुठेवाडगाव चारी रुंदीकरण कामास प्रारंभ;जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी

श्रीरामपूर-तालुक्यातील मुठेवाडगाव येथील एन बी कॅनोल पासुन ते मुठेवाडगांव गावापर्यंतच्या मुख्य चारीचे रुंदिकरण व खोदकामास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे...

श्रीरामपूर-
तालुक्यातील मुठेवाडगाव येथील एन बी कॅनोल पासुन ते मुठेवाडगांव गावापर्यंतच्या मुख्य चारीचे रुंदिकरण व खोदकामास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटिल यांच्या विशेष सहकार्यने कामास प्रारंभ झाला आहे.परिसरातील शेतकऱ्यांना आता पूर्ण दाबाने पाणी मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
या कामासाठी भाजपचे तालुका सरचिटणीस डॉ शंकरराव मुठे यांनी नामदार विखे पाटील साहेब यांच्या कडे चारीच्या कामासाठी मागणी केली होती की मुठेवाडगांव व भोकर (पटारे फाटा) या दोन गांवसाठी एकच चारी आहे व ती अरुंद आहे त्यामुळे मार्तन्ड फाटा येथे २० ते २५ केसेस पर्यन्त पाणी मिळत होते त्यामुळे गांवतील लोकाना शेतीसाठी पुर्णदाबाने पाणी मिळत नव्हते. त्यामुळे गांवतील टेलच्या शेतकऱ्यांचे भरणे कायम राहत होते.आता चारिचे काम आहे त्यापेक्षा दोन फुट खोल व  रुंद करण्यात आल्याने पुर्ण दबाने म्हणजे ४० क्यूसेस ने पाणी मिळणार आहे. या कामची पाहणी डॉ.शंकरराव मुठे,कॅनॉल निरीक्षक धनवटे भाऊसाहेब, वारकरी संप्रदायचे तालुका अध्यक्ष भिकचंद मुठे,स्वामी समर्थ केंद्राचे दिलीप मुठे,रावण मुठे,जालिंदर मुठे,मल्हारी मुठे सह अनेक शेतकरी उपस्थित होते.चारीचे काम केल्याबद्दल नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील साहेब, पाटबंधारेचे कल्हापुरे,धनवटे व डॉ शंकरराव मुठे यांचे मुठेवाडगाव व भोकर येथील शेतकरी यांनी आभार मानले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!