‘त्या’ इन्वेस्टमेंट कंपनीभोवती आवळला कारवाईचा फास;अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचा दणका

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात सुरू असलेल्या एका इन्वेस्टमेंटच्या कार्यालयाची अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयातील पथकाकडून झाडाझडती सुरु झाली आहे.उपविभागीय...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात सुरू असलेल्या एका इन्वेस्टमेंटच्या कार्यालयाची अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयातील पथकाकडून झाडाझडती सुरु झाली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर व अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व स्टाफ संयुक्तरित्या अजूनही या इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या कागदपत्रांची झडती करून पुढील कारवाई करत आहे.दरम्यान या कारवाईने जादा पैशांच्या आमिषाने गुंतवणूक करणाऱ्या परिसरासह जिल्ह्याबाहेरील अनेक गुंतवणूकदारांचे धाबे आता दणाणले आहेत.अनेक पुढाऱ्यांचाही बेनामी पैसाही येथे गुंतवण्यात आलेला आहे.सदर व्यक्ती पंजाबला गेल्याची माहिती तपासात पुढे आली असली तरी कागदपत्रांतील मिळालेल्या महितीनुसार फसवणूक झालेल्यांचा आकडा कित्येक कोटींच्या घरात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण झडतीचे व्हिडिओ शूटिंग करून रीतसर पंचनामा करण्यात आला आहे. काही महत्त्वाचे दस्तऐवजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सदर कंपनीच्या कार्यालयाला पोलीस विभागाकडून पंचासमक्ष सील ठोकले आहे.
संबंधितांना रितसर समन्स बजावून परवानगी बाबतचे दस्तऐवजांची पडताळणी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलीस विभाग करणार आहे.गेल्या काही दिवसांपासून सदर इन्वेस्टमेंट कंपनी बाबत तोंडी स्वरूपात पोलीस अधिकाऱ्यांकंडे तक्रारी प्राप्त होत होत्या. पुढील संभाव्य फसवणुकीच्या प्रकारांना आळा म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः होऊन सदरची कारवाई केलेली असून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर व अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व स्टाफ अजूनही झडती कारवाई करत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!