श्रीरामपुरच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे करण ससाणे;प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपच्या बिहाणी यांचा पराभव;राष्ट्रवादीच्या अनुराधा आदिक यांचाही धक्कादायक पराभव
श्रीरामपूर-नितीन शेळकेश्रीरामपूर नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत श्रीरामपूर नगरपालिकेवर आपली एकहाती सत्ता आणली.काँग्रेस...
श्रीरामपूर-नितीन शेळके श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत श्रीरामपूर नगरपालिकेवर आपली एकहाती सत्ता आणली.काँग्रेस व भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या या नगरपालिका निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.यासह माजी नगराध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकपदाच्या उमेदवार अनुराधा आदिक यांचाही या निवडणुकीत पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला आपले खाते देखील उघडता न आल्याने पक्षाची मोठी नाचक्की झाली आहे.दरम्यान नगराध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे यांनी दणदणीत विजय मिळवत शहराचा प्रथम नागरिक होण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. नगरसेवक पदाच्या काँग्रेसने सर्वाधिक २० जागा जिंकल्या. बहुमत प्राप्त केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या १० जागा तर शिवसेना शिंदे गटाच्या ३ जागा आणि एका अपक्ष उमेदवाराने विजय संपादन केला आहे.नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मिळवलेल्या या विजयामुळे कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष केला. श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे करण ससाणे हे २४७२४ मते मिळवून विजयी झाले.तर पराभूत उमेदवार भाजपचे श्रीनिवास बिहाणी १७९५७,शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश चित्ते ८०८६, उबाठा गटाचे अशोक थोरे ७५१,कोल्हे वसंत विठ्ठल (अपक्ष) ६२४,भालेराव निलेश भागाजी (अपक्ष) १७९,शेख जोयेफ युनुस (सपा) ७६८,शेंडे आकाश सुरेश (बसपा) ३२९,त्रिभुवन चरण दादा (वंचित) २३९ इतकी मते मिळाली. तर नगरसेवकपदी प्रभाग १ मधून वमने दिपक वसंतराव (काँग्रेस) ,कक्कड सोनिया चरणजितसिंग (काँग्रेस) , प्रभाग २ मधून चव्हाण प्रणिती दिपक (काँग्रेस), दाभाडे अर्जुन खुशाल (अपक्ष) तर प्रभाग ३ मधून एडके नागेश्वरी भाऊसाहेब उर्फ रितेश ( काँग्रेस ) ९४४, सानप कांचन दिलीप (काँग्रेस) ,प्रभाग ४ मधून नागरे दिलीप एकनाथ (काँग्रेस) , सेठी नवनीत कौर हरदीप सिंग उर्फ लकी सेठी (काँग्रेस) ,प्रभाग ५ मधून शेख जकिया सादिक (काँग्रेस) ,शेख मुजफ्फर पापाभाई (काँग्रेस),प्रभाग ६ मधून पवार राजेंद्र जगन्नाथ (काँग्रेस), शहा शाहेला शहारोज (काँग्रेस) प्रभाग ७ मधून आढागळे शाम अर्जुन (काँग्रेस),शेख यासमीन जावेद (काँग्रेस),प्रभाग ८ मधून कुरेशी जाहेदाबी कलीम (काँग्रेस) ,शेख रईस अब्दुलगनी (काँग्रेस) प्रभाग ९ मधून फंड सिध्दार्थ संजय (भाजप),शेख निलोफर महमंद (काँग्रेस),प्रभाग १० मधून पोटे वैशाली सुभाष (काँग्रेस), गांगड संदेश जनार्दन (भाजप),प्रभाग ११ मधून मुरकुटे मंजुश्री सिध्दार्थ (शिंदे सेना), धनवटे आशिष विजयकुमार (भाजप),प्रभाग १२ मधून बेग आकाश अशोक (शिंदे सेना),पाटील जयश्री रवि (भाजप), चव्हाण वैशाली दिपक (भाजप),चव्हाण दिपक बाळासाहेब (भाजप),प्रभाग १४ मधून कांबळे संतोष भाऊसाहेब (शिंदे सेना) , परदेशी आशा संतोष (काँग्रेस),प्रभाग १५ मधून नागले योगिता निलेश (काँग्रेस), जाधव योगेश लक्ष्मणराव (काँग्रेस),प्रभाग १६ मधून रासकर आशा शशांक (भाजप),छाजेड जितेंद्र सुभाष (भाजप),प्रभाग १७ मधून खोरे स्नेहल केतन (भाजप),लबडे मनोज दादासाहेब (भाजप) विजयी झाले आहेत.
श्रीरामपूरच्या जनतेने दडपशाहीला नाकारले.35 वर्षांत येथे कधीही जातीयवादी शक्तींना थारा मिळालेला नाही.येथील जनता ही स्वाभिमानी असून सदैव विकासाच्या पाठीशी असल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे.-आ. हेमंत ओगले
श्रीरामपूरच्या नागरिकांनी कोणत्याही दडपशाहीला आणि प्रलोभनांना बळी न पडता सजग,स्वाभिमानी असल्याचे दाखवून दिले.मतदारांनी माजी आमदार स्व.जयंत ससाणे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून काँग्रेसला मतदान केले.श्रीमपूरला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. –नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे
जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारत आहे आणि येथील पुढील काळातही जनतेची सेवा करणार आहे.जिंकलेल्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा. शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. –नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली
श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी
श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा
श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा
श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु