‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमात १ हजार ५४२ अर्ज निकाली;मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेचे यश

श्रीरामपूर-राज्यात महसूल पंधरवडा मध्ये राबविण्यात आलेल्या “सैनिक हो तुमच्यासाठी” या उपक्रमात प्राप्त झालेल्या माजी सैनिकांच्या १हजार ९५६ अर्जापैकी १हजार ५४२ अर्ज...

श्रीरामपूर-
राज्यात महसूल पंधरवडा मध्ये राबविण्यात आलेल्या “सैनिक हो तुमच्यासाठी” या उपक्रमात प्राप्त झालेल्या माजी सैनिकांच्या  १हजार ९५६ अर्जापैकी १हजार ५४२ अर्ज निकाली काढण्यात आले असून १५माजी सैनिकांच्या जमीन वाटप प्रकरणावर विभागाने निर्णय केला आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात महसूल दिनाच्या निमिताने आयोजित करण्यात आलेल्या महसूल पंधरवडा मध्ये ‘एक दिवस सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमाचा समावेश प्राधान्याने करण्यात आला होता.यामध्ये प्राधान्याने निवृत  सैनिक तसेच शहीद जवानांच्या कुटूबियांना  महसूल विभागाशी संबंधित असलेल्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रथमच असा पुढाकार घेण्यात आला होता.राज्यातील सर्व विभागांमध्ये सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रमासाठी ३८३ शिबीर आयोजित करण्यात आली होती.
शिबीरामध्ये प्राप्त झालेल्या १हजार ९५६ अर्जावर तातडीने महसूल विभागाने कार्यवाही सुरू केली होती.संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा व्यक्तिशा आपण करीत होतो.यापैकी १हजार ५४२ अर्जावर कार्यवाही होवून माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न मार्गी लागले असल्याचे समाधान मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

अनेक सैनिकांच्या कुंटूबाचे जमीनीचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होते यापैकी १५ प्रकरण निकाली लावण्यात यश आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.माजी सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रम राबविण्यात आला त्याचे यश यानिमित्ताने अधोरेखित झाले.देशासाठी सेवा करताना कौटुंबिक प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे वर्षानुवर्ष समस्या तशाच होत्या.महसूल पंधरवड्याच्या माध्यमातून सैनिकांच्या कुंटूबियांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी योगदान देता आल्याचे समाधान मोठे असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!