नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवकपदासाठी १४८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात;२७ उमेदवारांनी घेतली माघार

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल २७४ उमेदवारी अर्जांपैकी २७ उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी माघार घेतली आहे. आता नगराध्यक्षपदासाठी ९...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल २७४ उमेदवारी अर्जांपैकी २७ उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी माघार घेतली आहे. आता नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवकपदासाठी १४८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत. नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेस, भाजप, शिवसेना (शिंदे) व शिवसेना(उबाठा) या  पक्षांचे उमेदवार आमनेसामने असून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
श्रीरामपूर नगरपालिका निवडणूकिसाठी आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत होती. नगरसेवकपदासाठी काँग्रेस व भाजप यांनी प्रत्येकी ३४, शिवसेना (शिंदे गट) ने ३२, तर शिवसेना (ठाकरे गट) ने ११ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण १० उमेदवारांपैकी अपक्ष उमेदवार निलोफर पटेल यांनी माघार घेतल्याने आता ९ उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये वसंत कोल्हे, प्रकाश चित्ते (शिवसेना-शिंदे गट), अशोक थोरे (शिवसेना-ठाकरे गट), श्रीनिवास बिहाणी (भाजप), निलेश भालेराव (अपक्ष), जोएफ शेख (समाजवादी), आकाश शेंडे (बीएसपी), करण ससाणे (काँग्रेस) व चरण त्रिभुवन (वंचित बहुजन आघाडी) यांचा समावेश आहे.नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांतून २७ माघारी नोंदवण्यात आल्या असून माघारीनंतर १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.दरम्यान आता श्रीरामपूर नगरपालिका निवडणूकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून उमेदवारांना प्रचारासाठी उणेपूरे 10 ते 12 दिवस मिळणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

प्रभागनिहाय माघारी पुढीलप्रमाणे—
१-अ : सोनवणे जनार्धन
२-ब : पठाण जावेद जब्बार
३-अ : ढोकणे सुनीता रामदास
३-ब : शिंदे बाळासाहेब अर्जुन, यादव विशाल बिपीनचंद्र
४-अ : खान शेहरोज मुस्ताफा
४-ब : पंडित रोमा रवींद्र
६-अ : शाह अफरोज फिरोज
6-ब : नर्गिस मुक्तार मन्यार
८-अ : शाह ताहेरा मुक्तार
९-ब : अंभोरे भारती
१०-अ : पोटे ऋतुजा सुभाष, रोकडे पेरुबाई बबन
१०-ब : जाधव उकास आण्णासाहेब, चव्हाण देविदास काशिनाथ, खिलारी कविता रवींद्र, कदम सोमनाथ फक्कड
१२-अ : नंदूबाई कडू शेलार
१२-ब : छल्लारे शिवानी संजय
१३-ब : माटा विवेक पारसकुमार
१४-अ : साळवे संजू नाना
१४-ब : माटा दीपाली पारसकुमार
१५-ब : खोसरे वनिता बाबासाहेब
१६-अ : डोखे युवराज सुरेश
१६-ब : जाधव स्वप्नील संजय
१७-ब : कुऱ्हे प्रमोद खंडू

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!