शिवमहापुराण कथेला येणाऱ्या भाविकांचे दागीने चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद;२३ महिला व ३ पुरुष आरोपींना अटक
श्रीरामपूर-निर्मळपिंप्री ता.राहाता येथे आयोजित करण्यात आलेल्यापंडीत प्रदिप मिश्रा महाराज यांच्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमासाठी देशभरातुन लाखो महिला व पुरुष भाविक सहभागी झालेले...
श्रीरामपूर- निर्मळपिंप्री ता.राहाता येथे आयोजित करण्यात आलेल्या पंडीत प्रदिप मिश्रा महाराज यांच्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमासाठी देशभरातुन लाखो महिला व पुरुष भाविक सहभागी झालेले होते.या कथेदरम्यान विविध ठिकाणी भाविकांच्या मौल्यवान वस्तु चोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी कारवाई करत २३ महिला व ०३ पुरुष अशा २६ आरोपींना अटक करुन सर्वांची नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी, राहाता, लोणी या ठिकाणी पायी पेट्रोलिंग, हॉटेल व लॉज चेंकींग,संशयित गुन्हेगारांवर पाळत तसेच नाकाबंदी करुन शिवमहापुराण कथा सुरळीत पार पाडण्याकरीता पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली होती. शिवमहापुराण कथेदरम्यान शिर्डी येथे पंडीत प्रदिप मिश्रा यांची मिरवणुक काढण्यात आलेली होती.सदर मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेवुन भाविक महिला व पुरुषांच्या अंगावरील दागिने व मौल्यवान वस्तु यांची घातक शस्त्रासह चोरी करुन दरोडा घालण्याच्या पुर्वतयारीत असलेल्या शिल्पा पप्पु कुमार वय २३ वर्ष रा. जुसी ता.जुसी जि. अलाहाबाद राज्य उत्तर प्रदेश,पुनम राजेश कुमार वय ४० वर्ष रा.चितनपुर ता. सदर जि. वाराणसी राज्य उत्तर प्रदेश,अंजली संदिप कुमार वय २२ वर्ष रा.जुकीया ता. कैसरगंज जि.भराईच राज्य उत्तर प्रदेश,पुजा हनुमान कुमार वय २० वर्ष रा. मुगलसराय ता. मुगलसराय जि. चांडोली राज्य उत्तर प्रदेश,दुलारी घुरण कुमार वय ५० वर्ष रा.जुसी रेल्वे स्टेशन ता.जुसी जि.अलाहाबाद राज्य उत्तर प्रदेश,उन्नी सुरेशचंद्र पवार वय ४५ वर्ष रा. पुरणनगर ता. कोटपुरी जि. जयपुर राज्य राजस्थान अशा ०६ महिला आरोपींना श्री साईबाबा मंदिर परीसरात गेट नं. ४ येथे पकडण्यात आले.त्यांच्याकडे कटर व ब्लेड अशी घातक शस्त्रास्रे मिळून आल्याने त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ९२९/२०२५ भा.न्या.संहिता २०२३ चे कलम ३१० (४),३१० (५) अन्वये गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास शिर्डी पो.स्टे.चे पोसई काळे करीत आहेत.तसेच दि.१२ रोजी निर्मळ पिंप्री ते लोणी रस्त्याच्या कडेला न्यु इंग्लिश शाळेजवळ ता.राहाता सांयकाळी भाविक महिला व पुरुषांचे अंगावरील दागिने, मौल्यवान वस्तु व पैसे यांची घातक शस्त्रासह चोरी करुन दरोडा घालण्याच्या पुर्व तयारीत असलेल्या शिंदु विरु राखडे वय ४० वर्ष, देवकाबाई मनिष हातांगळे वय ५५ वर्ष,छाया गोविंद हातांगळे वय ५५ वर्ष, भारती कालीन नाडे वय ४० वर्ष, पुजा पंकज लोंढे वय ४५ वर्ष,नंदिनी गुलशन राखडे वय ३५ वर्ष,उज्वला शिवा सकट वय ३० वर्ष, वर्षा निलेश खंडारे वय ४० वर्ष रा. अशोकनगर जि. वर्धा, दुर्गा संजय राखपसरे वय ३९ वर्ष, नंदा संजय सकट वय ४५ वर्ष रा. गंगानगर ता. नेवासा जि. अहिल्यानगर,सागर रमेश डोंगरे वय ३३ वर्ष रा.तार फैल वार्ड क्र.२८ वर्धा जि. वर्धा, नितीन जगदिश समुद्रे वय ३५ वर्ष रा. मस्जिद चौक, फुल फैल वर्धा जि. वर्धा, सचिन कुमार सुखदेव महोतो वय २१ रा. झारखंड अशा १० महिला व ३ पुरुष यांना पकडण्यात आले.त्यांचेकडे चाकु, कटर, ब्लेड व मारुती स्वीप्ट डिझायर गाडी नं. एमएच ३२ एएस ५७९० असे वाहन व घातक शस्त्रे मिळुन आल्याने त्यांच्यावर लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५५३/२०२५ भा. न्या. संहिता २०२३ चे कलम ३१० (४), ३१०(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास लोणी पो.स्टे.चे पोसई चौधरी करीत आहेत.तसेच दि.१४ रोजी सांयकाळी श्री साईबाबा मंदिर सोळा गुंठे परीसर शिर्डी येथे घातक शस्त्रासह चोरी करुन दरोडा घालण्याचे पुर्वतयारीत असताना लाली लक्ष्मणसिंग वय २० वर्ष, रुक्मीणी गोपाल सिंग वय २२ वर्ष, लच्चो लक्ष्मण सिंग,सितो प्रेम सिंग,कौशल्या हुकुम सिंग,भटेरा सिताराम सिंग सर्व रा. मरोली ता. होडल जि. फरीदाबाद राज्य हरीयाणा यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता वरील पैकी लाली लक्ष्मणसिंग वय २० वर्ष, रुक्मीणी गोपाल सिंग वय २२ वर्ष हया कटर, ब्लेड अशा घातक शस्त्रासह मिळुन आल्या. त्यांचे साथीदार गर्दीचा फायदा घेवुन पसार झाले. त्यांचेविरुध्द शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ९३४/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३१० (४), ३१०(५) अन्वये गुन्हा नोंद करुन अ.नं. १ व २ यांना अटक करण्यात आली आहे.सदर गुन्हयाचा तपास शिर्डी पो.स्टे.चे सपोनि वाळके करीत आहेत.दि.१५ रोजी सांयकाळी निर्मळ पिंप्री ता.राहाता येथील शिवमहापुराण कथेचे मुख्य प्रवेशव्दाराजवळ घातक शस्त्रासह चोरी करुन दरोडा घालण्याचे पुर्वतयारीत असलेल्या काजल मनिष मालवी वय २५ वर्ष रा. मनसा जि. निमज राज्य मध्यप्रदेश,चंद्रवती लोधुकुमार हरजन वय ५७ वर्ष रा. रामबाग झोपडपटटी जि. इलहाबाद राज्य उत्तरप्रदेश, मायादेवी अमरकुमार हरजन वय ३० वर्ष रा. रामबाग झोपडपटटी जि. इलहाबाद राज्य उत्तरप्रदेश, पुष्पादेवी जसवाल कुमार हरजन वय २५ वर्ष रा. रा. रामबाग झोपडपटटी जि. इलहाबाद राज्य उत्तरप्रदेश,मालादेवी बिसालकुमार हरजन वय २५ वर्ष रा. रामबाग झोपडपटटी जि. इलहाबाद राज्य उत्तरप्रदेश अशा ५ महिलांना पकडण्यात आले. त्यांचेकडे चाकु, कटर ब्लेड असे घातक शस्त्रे मिळुन आल्याने त्यांना लोणी पोलीस स्टे गु.र.नं. ५५८/२०२५ भा. न्या. संहिता २०२३ चे कलम ३१० (४), ३१० (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास लोणी पो.स्टे.चे श्रेपोसई विखे करीत आहेत.अशा प्रकारे विविध घटनांत २३ महिला व ०३ पुरुष असे एकुण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महिला टोळीच्या डायरीत महाराजांच्या पुढील 2 वर्षांच्या तारखा
पॉकेट चोरी, मोबाईल चोरी, चैन चोरी त्याचप्रमाणे मोबाईल चोरी होऊ नये यासाठी यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी महाराजांच्या कथा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या त्या ठिकाणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून देखील माहिती प्राप्त करण्यात आली होती.विशेषतः महिला सेक्टरमध्ये त्याचप्रमाणे सभामंडपात प्रवेश करावयाच्या ठिकाणी साध्या गणवेशांमध्ये पोलिस अंमलदार नेमण्यात आले होते.त्याचाच परिणाम म्हणून कथेदरम्यान वरील प्रकारच्या चोऱ्या नियंत्रणात ठेवण्यात मदत झाली.काल रोजी पकडण्यात आलेल्या एका महिला चोरांच्या टोळीकडे तर महाराजांच्या पुढील दोन वर्षात ज्या ज्या ठिकाणी कथा होणार आहे त्या कथांचे तारीख, ठिकाण अशी सविस्तर माहिती डायरीमध्ये मिळून आली.
पोलिसांनी जप्त केलेली गाडी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा
श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद
श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी