श्रीरामपूर-
अशोक सहकारी साखर कारखाना सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात येणाऱ्या ऊसास पहिली उचल प्रती टन ३ हजार रुपये देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी जाहीर केले. अशोक कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. याबाबत श्री.मुरकुटे म्हणाले की, ज्ञानेश्वर कारखान्याने सन २०२५-२६ मध्ये ऊसाला प्रतीटन तीन हजार रुपये ॲडव्हान्स जाहीर केलेला आहे. आपणही कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ प्रसंगी व वेळोवेळी ‘अशोक’ चा ऊसदर आणि उचलीचा दर हा शेजारील ज्ञानेश्वर तसेच मुळा कारखान्यांच्या बरोबरीने राहिल, असे सांगितले होते.त्याप्रमाणे गाळपास येणाऱ्या उसाला तो दर देण्यात येणार असल्याचे मुरकुटे यांनी स्पष्ट केले.
