‘बोकांडी’ स्लोगन लिहलेल्या रावणाचे श्रीरामपूरात दहन;निवडणुकीपूर्वी राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात

श्रीरामपूर-विजयादशमी निमित्त श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ५१ फूट उंच भव्य रावण दहन कार्यक्रमाने यंदा राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली....

श्रीरामपूर-
विजयादशमी निमित्त श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ५१ फूट उंच भव्य रावण दहन कार्यक्रमाने यंदा राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली. परिवर्तन समितीच्या वतीने या रावणावर लिहिण्यात आलेल्या “बोकांडीच” या स्लोगन ने सर्वांचे लक्ष वेधले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी हा स्लोगन शहरात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.
या स्लोगनचे नेमके राजकीय संदर्भ काय आहेत, याबद्दल शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. आगामी पालिका ,जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ‘परिवर्तन’चा संदेश देणाऱ्या या घोषणेने, स्थानिक राजकारणातील ‘रावणरूपी’ समस्यांवर नेमके बोट ठेवले असल्याची चर्चा  सुरू झाली आहे. रावण दहनाच्या निमित्ताने शहरातील विविध पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने, राजकीय सौहार्दाचे चित्र देखील पहायला मिळाले.कामगार नेते नागेश सावंत, शिवसेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष सचिन बडदे आणि ‘आप’चे तिलक डुंगरवाल यांच्या वतीने या भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शहरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. या रावण दहन कार्यक्रमास सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी स्त्री शक्तीचा सन्मान करत सौ. सविता सावंत, सौ. चारुशीला डुंगरवाल, सौ. भाग्यश्री बडदे,सौ. सुषमा पवार,सौ. रेणुका डेंगळे,सौ. प्रिया सावंत, सौ. नीता भालेराव,सौ.सोनाली रणपिसे,सौ. अर्चना डेंगळे, सौ. लता भोसले यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने,भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. उपनगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बिहाणी ,सिद्धार्थ मुरकुटे,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, आशिष धनवटे, मनोज लबडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी,राहुल मुथा,  गौतम उपाध्ये, भाजपाचे रुपेश हरकल, योगेश ओझा, संजय गांगड आदी उपस्थित होते. यंदाच्या वर्षी परिवर्तन समितीच्या वतीने रावणावर लिहिलेल्या “बोकांडीच”  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल पवार,अमोल सावंत, आर्टिस्ट महेश आघाडे,यासीन भाई सय्यद, रोहित भोसले,भगवान सोनवणे, जहीर सलीम शेख, राहुल रणपिसे,जयेश सावंत,शिवाजी सावंत,  रोहित भोसले,भरत डेंगळे, तेजस ऊडे, विकी गोरे, राहुल डुकरे, अजीम पठाण, अर्जुन मांजरे,आदींनी विशेष प्रयत्न केले. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके तसेच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चोख बंदोबस्तात शहरवासीयांच्या साक्षीने हा रावण दहन कार्यक्रम संपन्न झाला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!