नगर-मनमाड वरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने;पोलीस अधीक्षक यांचे आदेश

श्रीरामपूर-जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जडवाहनांची वाहतूक त्वरित वळविण्याचे आदेश दिले...

श्रीरामपूर-
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जडवाहनांची वाहतूक त्वरित वळविण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या संदर्भातआदेश जारी केले आहेत. त्यानुसार आज दि. १२ सप्टेंबर पासून जडवाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
नगर-मनमाड महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.देशभरातून लाखो भाविक या रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्यावरील खड्डे, दुरावस्था, वारंवार होणारे अपघात आणि वाढत्या जडवाहनांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.गेल्या काही दिवसांत या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत स्वतः हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, रस्त्याचे काम वेगाने पूर्ण व्हावे, तसेच काम पूर्ण होईपर्यंत जड वाहतूक या मार्गावरून बंद करून वळविण्यात यावी.आज दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी वाहतूक वळविण्या बाबतचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.त्यानुसार ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.तसेच येत्या काही दिवसांत नगर-मनमाड मार्गाचे दुरुस्तीचे कामही जलदगतीने पूर्ण केले जाणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!