हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा;दोन पीडित महिलांची सुटका

श्रीरामपूर-शिर्डी शहरातील हॉटेल क्रांती या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यावरून पोलिसांच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकून हॉटेल...

श्रीरामपूर-
शिर्डी शहरातील हॉटेल क्रांती या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यावरून पोलिसांच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकून हॉटेल चालक व मालक यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईत घटनास्थळावरून सुमारे 32 हजार 280 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.श्री. वाघचौरे यांनी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय येथील पोलीस उपनिरीक्षक श्री.खोंडे यांना सदर प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्री.खोंडे यांनी संबंधित हॉटेलमध्ये बोगस ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय चालू असण्याची बाबतची खात्री केली असता सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याबाबतची पोलीस पथकाची खात्री पटली. त्या अनुषंगाने छापा टाकला असता सदर हॉटेलमध्ये दोन पिडित महिला मिळून आल्या असून सदर पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना निवारागृहात पाठवण्यात आले आहे.तसेच वेश्या व्यवसायावर  उपजीविका करणारे हॉटेल चालक व मालक यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. घटनास्थळावरून सुमारे 32 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे हे करत आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!