‘वंदे भारत’च्या थांब्यासाठी श्रीरामपूरातील सर्वपक्षीय एकवटले;बेलापूर रेल्वे स्टेशनवर निदर्शने

श्रीरामपूर-बेलापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा, साई सुपरफास्ट पॅसेंजर रोज सुरू करावी तसेच कोरोना काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या...

श्रीरामपूर-
बेलापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा, साई सुपरफास्ट पॅसेंजर रोज सुरू करावी तसेच कोरोना काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात या विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष  त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशनवर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी रेल्वे स्टेशन मॅनेजर एम.पी. पांडे यांना माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, सुभाष त्रिभुवन, गौतम उपाध्ये, रंजीत श्रीगोड राजेंद्र सोनवणे, मुक्तारभाई शहा संतोष डहाळे, रमाताई धीवर अमोल साबणे विठ्ठल गोराणे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले,नव्याने सुरू झालेली नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेनला बेलापूरमध्ये थांबा नसल्यामुळे श्रीरामपूर-बेलापूर परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी थांबा दिल्यास प्रवाशांना सुविधा तर मिळेलच, शिवाय रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “साई सुपरफास्ट पॅसेंजर सध्या आठवड्यात फक्त चारच दिवस चालते. ती दररोज सुरू करावी अशी नागरिकांची मागणी आहे. या ट्रेनमध्ये कायमच प्रवाशांची गर्दी असते, त्यामुळे ती रोज सुरू झाल्यास प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि रेल्वेलाही त्याचा आर्थिक फायदा होईल.”कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्याही तातडीने सुरू कराव्यात, अन्यथा सर्वसामान्य प्रवाशांचे हाल अधिकच वाढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मैसूर–वाराणसी एक्सप्रेस कोपरगावला दीड तास थांबते, पण बेलापूर-श्रीरामपूरला दोन मिनिटांचाही थांबा देत नाही, ही बाब अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जर या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेवटी त्रिभुवन यांनी दिला त्यावेळी राजू बत्रा बन्सीलाल फेरवानी तेजस गायकवाड अमोल काळे संतोष कांबळे  रॉकी लोंढे योगेश ओझा  भागचंद नवगिरे लहू खंडागळे राजेश वाव्हळ बाळासाहेब ठाकरे  विलास जाधव अल्ताफ  शेख राहुल शहाणे रईस शेख शाहरुख  मन्सुरी मिलिंद धीवर किशोर फाजगे बाळासाहेब जपे बाळासाहेब ढाकणे किशोर नागरे दीपक माखीजा रोशन बत्रा नितीन कापुरे किशोर गाडे सागर कुदळे प्रकाश पाटणी राहुल नाणेकर किशोर ऋषिकेश अवताडे अरुण बोराडे संभाजीराव देवकर नितीन  मासाळ भाऊसाहेब जाधव राकेश थोरात अल्ताफ पोपटिया,रिपाई भाजप मनसे राष्ट्रवादी शिवसेना मर्चंट असोसिएशन व्यापारी संघटना राष्ट्रीय जनसेवा पार्टी भारतीय लहुजी सेना संघटना भिम शक्ती मातंग अस्मिता सेना बहुजन क्रांती सेना गुरुनानक मार्केट व्यापारी वर्गआदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

रेल्वे स्टेशन मॅनेजर एम.पी.पांडे यांना सर्वपक्षीयांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!