पालकमंत्री विखे पाटील यांचा गर्भित इशारा;महायुतीचे कार्यकर्तेही ‘त्याच’ भाषेत उत्तर देतील;आ.खताळ हल्ल्याचा निषेध

श्रीरामपूर-संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर शहरातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात भ्याड हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण...

श्रीरामपूर-
संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर शहरातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात भ्याड हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.विखे पाटील यांनी आरोपीच्या मागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. तसेच काही लोकांना ठोकशाही मान्य असेल तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, अशा शब्दात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधितांना इशाराही दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला करण्यात आल्याने  शिवसेना गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावर पालकमंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. ते म्हणाले की,आमदार अमोल खताळ यांच्यावरील या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. हे हल्लेखोर कुणाचे पुरस्कृत आहेत का? याची माहिती घेऊन यासंदर्भात चौकशीचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत. भ्याड हल्ला करून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल असा काही लोकांचा गैरसमज आहे. हा गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही,असा इशाराही त्यांनी राजकीय विरोधकांना दिला. तर, दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेशही दिल्याचं त्यांनी म्हटलं.
काही लोकांनी लोकशाहीचा कौल मान्य केला पाहिजे, त्यांना जर लोकशाही मान्य नसेल,ठोकशाहीच त्यांना मान्य असेल तर संगमनेर तालुक्यातील कार्यकर्तेही त्याच भाषेत उत्तर देतील, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!