संगमनेरचे आ.अमोल खताळ यांच्यावर हल्ला;माथेफिरू तरुणाला सुरक्षा रक्षकांनी पकडले

श्रीरामपूर-संगमनेरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमात एका माथेफिरुने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्लेखोराला आमदार खताळ यांच्या...

श्रीरामपूर-
संगमनेरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमात एका माथेफिरुने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्लेखोराला आमदार खताळ यांच्या सुरक्षारक्षकांनी तत्काळ ताब्यात घेत जेरबंद केले असून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान या घटनेने संगमनेर तालुक्यासह जिल्हाभरात संतापाची भावना निर्माण झाली आहे. आमदारांवरील हल्ल्याच्या धक्कादायक घटनेने संगगमनेर तालुक्यात ऐन गणेशोत्सवाट तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजस्थान युवक मंडळाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी आमदार अमोल खताळ मालपाणी लॉन्स या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर बाहेर पडताना ते उपस्थित असलेल्या प्रेक्षकांशी हस्तांदोलन करीत असतानाच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका तरुणाने त्यांच्या हातात हात देण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला.तात्काळ आ. खताळ यांच्या सुरक्षारक्षकाने हल्लेखोरावर झडप घातली व त्यास जेरबंद केले. हल्ल्याचह्या घटनेने  तेथे उपस्थित असलेल्या मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षारक्षकांनीही धाव घेत हल्लेखोर तरुणाला कार्यालयात नेऊन कोंडले.घडलेली घटना वाऱ्याच्या वेगाने शहरभर पसरली.
सदरच्या घटनेने संगमनेर तालुका व परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर उपस्थितांमधील अनेकांसह ही घटना शहरात कळल्यानंतर काही वेळातच शेकडो तरुणांनी मालपाणी लॉन्सच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी हल्लेखोराला पोलीस ठाण्यात आणले आहे. या घटनेने ऐन गणेशोत्सवात संगमनेरातील राजकारण तापण्याची शक्यता असून तालुक्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. संगमनेर सारख्या सुसंस्कृत शहरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांनी संगमनेर शहराचे नाव बदनाम होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आ. अमोल खताळ
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!